आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगांडाच्या तरुणींची वैद्यकीय चाचणी: \'आप\'चे मंत्री भारतींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - युगांडाच्या दोन तरुणींच्या तक्रारीवरुन पटियाला हाऊस कोर्टाने आप सरकारचे मंत्री सोमनाथ भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. शनिवारी युगांडाच्या दोन तरुणींनी अपील दाखल केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, की दिल्लीचे मंत्री सोमनाथ भारती आणि त्यांच्यासह आलेल्या इतर लोकांनी मारहाण केली आणि बळजबरीने त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (रविवार) झालेल्या सुनावणीत कोर्टाने दिल्ली पोलिसांना भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारती यांचा बचाव केला होता. त्यांना विचारण्यात आले होते, की तुमच्या कायदा मंत्रींनी युगांडाच्या दोन महिलांसोबत बेकायदेशीर वर्तणूक केली. त्यावर केजरीवाल म्हणाले होत, 'सोमनाथ भारती यांनी काहीही चूकीचे केलेले नाही. तिथे अनैतिक देहव्यापार आणि आंमली पदार्थांचा व्यापर सुरु होता.' आता कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर केजरीवाल सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

सोमनाथ भारती दिल्लीचे कायदा मंत्री आहेत. त्यांनी याआधी दिल्लीतील न्यायाधिशांची बैठक बोलावली होती. त्यावरुनही वाद निर्माण झाला होता.