आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया-जेटली यांच्याविरोधात ‘आप’ला उमेदवार मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीने नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना अडचणीत आणण्याची तयारी सुरू केली आहे. केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या पक्षाला सोनिया गांधी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याविरुद्ध उमेदवार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या रायबरेली, लखनऊ आणि पंजाबच्या अमृतसर जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आला नाही. आपने 339 उमेदवार जाहीर केले आहेत. येत्या काही दिवसांत हा आकडा 400 पर्यंत जाईल.