आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- कॉंग्रेसला चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कारावा लागला होता. दिल्लीत आम आदमी पार्टीमुळे कॉंग्रेसला सर्वाधिक फटका बसला. तर, भाजपलाही सरकार स्थापन करता आले नाही. आता आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
पहिल्या टप्प्यात 'आप'ने हरियाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. हरियाणातील भारतीय किसान युनियनसोबत लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा पक्षाने केलली आहे. त्यासाठी 'आप'चे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव हरियाणामध्ये तळ ठोकून आहेत. योगेंद्र यादव गुडगाव येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. तसेच प्रशांत भूषण हे नोयडा किंवा अलाहाबाद येथून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कुमार विश्वास यांनी राहुल गांधींविरुद्ध अमेठी येथून उभे राहणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
आम आदमी पार्टीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. कॉंग्रेसने 'आप'ला पाठींबा देण्यामागे एक मोठे कारण मानले जात आहे. दिल्लीत कॉंग्रेसचे 8 आमदार निवडून आले. ते सर्व मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदार अजुनही आपल्यासोबत असल्याचे कॉंग्रेसला वाटते. दुसरे म्हणजे, भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता 'आप'मध्ये आहे, असे लोकांना वाटू लागले आहे. कॉंग्रेसलाही असे वाटत आहे. म्हणूनच पाठींबा देण्याचा डाव कॉंग्रेसने रचल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये याच्या विरुद्ध मतप्रवाहदेखील आहे. कॉंग्रेसने केजरीवाल यांना पाठींबा देऊन मोदींच्या रथला रोखण्याचा प्रयत्न केल्यास मुस्लिम मतदार 'आप'कडे ओढल्या जाईल, अशी भीती कॉंग्रेसला वाटत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.