आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणातील घाण दूर करण्‍यासाठी 'आप' पक्षाने केली 'झाडू' चिन्‍हाची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आम आदमी पार्टी (आप)चे नेता अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षाचे निवडणूक चिन्‍ह 'झाडू'ची औपचारिक घोषणा केली.

केजरीवाल आणि पक्षाचे इतर नेत्‍यांनी मंदिर मार्ग येथील वाल्‍मिकी मंदिरात निवडणूक चिन्‍हाची घोषणा केल्‍यानंतर मंदिर परिसर झाडून साफ केले. या पवित्र भूमीवर आपल्‍या यात्रेची सुरूवात करीत असून याच झाडूच्‍या मदतीने राजकारण आणि समाजातील घाण साफ करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी आम आदमी पक्षाची टोपी घालून आणि हातात झाडू घेऊन शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. केजरीवाल पुढे म्‍हणाले, झाडू श्रमाच्‍या सन्‍मानाचे प्रतीक आहे. पक्ष या झाडूने आमच्‍या सरकार आणि आमच्‍या आमदारांमध्‍ये घुसलेली घाण साफ करणार आहे. आता भ्रष्‍ट असलेल्‍या राजकीय पक्षांचा सफाया करण्‍याची वेळ आली आहे.