आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल मिश्रा उपोषणावर; आम आदमी पार्टीच्या परदेश दौऱ्याचा तपशील जाहीर करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पदावरून हटवण्यात आलेले दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी बुधवारी उपोषणाला सुरूवात केली. आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या परदेश दौऱ्याचा तपशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेत्यांच्या परदेश दौऱ्याचा तपशील मिळत नाही, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहील. हे धरणे नाही. मला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हा संदेश द्यायचा आहे. त्यांनी सत्येंद्र जैन, आशिष खेतान, राघव चढ्ढा, संजय सिंह व दुर्गेश पाठक यांच्या परदेश दौऱ्याचा तपशील जगजाहीर करावा, असे मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले. 

मिश्रा यांना केजरीवालांनी मंत्रिपदावरून काढून टाकले आहे. केजरीवाल यांनी २ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावरून देशभरात खळबळ उडाली होती.दरम्यान, पंजाब संयोजक पदावरून हटवण्यात आलेले गुरप्रीत घुग्गी यांनी आम आदमी पार्टीला रामराम ठोकला आहे. त्यांच्या जागी पक्षाने भगवंत मान यांना जबाबदारी सोपवली आहे. मान यांच्याकडे संयोजक पद गेल्याने कसलीही नाराजी नसल्याचे घुग्गी यांनी म्हटले आहे.
 
हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...