आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'ची सातवी यादी जाहीर, आतापर्यंत 268 उमेदवारांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीने (आप) लोकसभा उमेदवारांची सातवी यादी आज (मंगळवार) प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये 11 राज्यातील उमेदवारांचा समावेश आहे. अणु उर्जेला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते एस.पी.उदयकुमार यांना आपने कन्याकुमारी येथून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणु उर्जा प्रकल्पाला उदयकुमार यांचा विरोध आहे. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा आंदोलन केले आहे.
या यादीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा समावेश नाही. बंगळुरु येथील सभेत केजरीवाल यांनी म्हटले होते, की पक्षाची इच्छा आहे की मी वाराणसी येथून मोदींच्या विरोधात निवडणूक लढावी. मात्र, 23 मार्चला मी वाराणसीला जाईल तेथील जनतेचा कौल जाणून घेतल्यानंतरच उमेदवारीचा निर्णय घेण्यात येईल. आपने आतापर्यंत 268 उमेदवारांची घोषणा केली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत तामिळनाडूमधून 8, बिहार 6, उत्तरप्रदेश 4, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, पद्दूचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम आणि त्रिपूरा येथून प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून नरेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बिहार
नवादा - राजेंद्र सिंह
औरंगाबाद - रागिनी लता सिंह
गया - धनंजय पासवान
जमुई - बिनोद कुमार दास
काराकाट - गुलाम कुंदनम
नालंदा - प्रणव प्रकाश
तामिळनाडू
कोईंबतूर - पोन चंद्रन
इरोड - के.के. कुमार स्वामी
कन्याकुमारी - डॉ. एस.पी. उदयकुमार
सलेम - सतीश कुमार
थुटूकुड्डी - एम.पुष्पारायन
चेन्नई सेंट्रल - जे. प्रभाकर
तिरूनेलवेली - जेसुराज एम. पी.
तिरूप्पुर - आर. चक्रवर्थी राजगोपालकृष्णन
उत्‍तर प्रदेश
फिरोजाबाद - राकेश यादव
रामपुर - सलमान अली खान
शाहजहांपुर - रीता सिंह
बांसगांव - रामनिवास पासवान
मणिपुर (इनर) - डॉ. इंबोचा सिंह
मिझोराम - लाल मंजुला
पद्दुचेरी - रंगराजन.वी
पंजाबच्या आंनदपुर साहिब - हिम्मत सिंह शेरगिल
राजस्‍थानच्या चित्तौडगड येथून डॉ. नरेंद्र गुप्ता
सिक्किम - कौशल राय
त्रिपुरा (ईस्ट) - कर्ण बिजॉय जमातिया