आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Supporter Demand To Return Kejriwal\'s Blue Wagon R

AAP समर्थकाने परत मागितली केजरींची व्हॅगनआर, निधी घटला, कलह वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीत सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळे केवळ पक्षाचे कार्यकर्ते नाराज नाहीत तर देश-विदेशातील समर्थकांमध्येही हेच वातावरण असल्याचे दिसून येते. ब्रिटनमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर कुंदन शर्मा आपचे समर्थक आहेत. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निळी व्हॅगनआर पक्षाच्या कामासाठी दिली होती. आता त्यांनी पक्षातील कलह बघून ही व्हॅगनआर परत मागितली आहे. दुसरीकडे, आपला मिळणाऱ्या निधीतही मोठी घट झाली आहे. प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना निलंबित केल्याने देणगीदार नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
निळी व्हॅगनआर ही कार अरविंद केजरीवाल यांची ओळख होती. या कारमध्येच ते फिरत असत. पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये ही कार त्यांची ओळख होती. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा केजरीवाल याच कारमध्ये बसून शपथविधीसाठी गेले होते. पण आता पक्षात मोठा कलह सुरु झाल्याने कुंदन शर्मा यांनी कार परत मागितली आहे. एवढेच नव्हे तर पक्षाला दिलेला सर्व निधी परत करण्याची मागणी केली आहे.
आपच्या आंदोलनाने प्रभावित झाले होते कुंदन शर्मा
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना कुंदन शर्मा म्हणाले, की निळी व्हॅगनआर माझ्या पत्नीच्या नावे रजिस्टर आहे. आम्ही या कारचा वापर करीत नाही. मला ही कार आपला द्यायची होती. कारण मी आपच्या आंदोलनाने प्रभावित झालो होतो. हा पक्ष काही तरी वेगळे करेल असे वाटले होते. पण माझी निराशा झाली आहे.
केजरींनी या कारमध्ये घेतली होती कॅबिनेट मिटिंग
पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला जायचे असेल तर अरविंद केजरीवाल या कारचा उपयोग करायचे. यात त्यांच्यासोबत एक चालक आणि सहकारी मनिष शिसोदिया दिसायचे. दिल्लीचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा एकदा केजरींनी या कारमध्येच कॅबिनेटची मिटिंग घेतली होती.
आपला मिळणाऱ्या निधीत घट
आपमध्ये गृहकलह सुरु असल्याने पक्षाला मिळणाऱ्या निधीत गेल्या 15 दिवसांत मोठी घट झाली आहे. पक्षाला सातत्याने निधी देणाऱ्या देणगीदारांमध्येही घट झाली आहे. पक्षाच्या वेबसाईटवर असलेल्या आकड्यांप्रमाणे, 26 मार्च रोजी केवळ 264 रुपये निधी मिळाला. तर 25 मार्च रोजी 733 रुपये मिळाले होते. मार्च महिन्यात एकूण निधी 46 लाख रुपये राहिला आहे. मार्च 2014 मध्ये ही संख्या तब्बल 9 कोटी 20 लाख होती.
पुढील स्लाईडवर वाचा, केजरीवाल यांच्याशी मनमिलाफ करण्यावर शांती भुषण यांनी दिली होती घर सोडण्याची धमकी...भगत सेनेने केजरींना म्हटले हिटलर...कुंदन शर्माने कार परत मागितल्यावर अशा आल्या ट्विट्स...