आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्री होण्‍यापूर्वीच सक्रीय झाले केजरीवाल, शपथविधीला मेट्रोनेच जाणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्‍लीचे भावी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथविधीला रामलीला मैदानापर्यंत मेट्रो रेल्‍वेने जाण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍यासोबत 'आप'चे सर्व आमदारही मेट्रोनेच जाणार आहे. दिल्‍लीकरांनाही याचे अनुकरण करण्‍याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

केजरीवाल यांनी व्‍हीआयपी संस्‍कृतीला छेद देण्‍याचा अजेंडा हाती घेतला आहे. स्‍वतः त्‍यावर ते अंमलबजावणी करत आहेत. त्‍यांनी व्‍हीआयपी सुरक्षा आणि मुख्‍यमंत्र्यांचे शासकीय निवासस्‍थान घेण्‍यास यापूर्वीच नकार दिला आहे.

दरम्‍यान, आम आदमी पार्टीने आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पक्षातर्फे एका पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्‍यात आली. तसेच उमेदवाराच्‍या निवडीसाठी इच्‍छुकांना अर्जही वितरित करण्‍यात आले. लोकसभेच्‍या रणधुमाळीत 'आप'च्‍या निशाण्‍यावर राहुल गांधी असणार आहेत. त्‍यांच्‍या अमेठी मतदारसंघात 'आप'चे नेते कुमार विश्‍वास दौरा करणार असून ते राहुल गांधींविरुद्ध लोकसभा लढविण्‍याच्‍या तयारीत आहेत. दुसरीकडे, 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान होण्‍यापूर्वीच सक्रीय झाले आहेत. ते 28 डिसेंबरला मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. परंतु, त्‍यापूर्वी आज (शुक्रवार) नवी दिल्‍ली विधानसभा मतदारसंघात काही भागांचा दौरा करणार आहेत. तेथील नागरिकांसोबत चर्चा करुन त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केजरीवाल करणार आहेत. विशेष म्‍हणजे, तेथेच उपस्थित अधिका-यांना समस्‍यांवर तोडगा विचारुन लगेच निराकरण करण्‍यासाठी सांगणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्‍या निवडीसाठी 'आप'ने दोन सदस्‍यीय समिती स्‍थापन केली आहे. त्‍यातच कॉंग्रेस आणि भाजप यासारख्‍या बड्या पक्षातून अनेक जण 'आप'मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी इच्‍छुक आहेत. त्‍यात एक मोठे नाव आहे युवा कॉंग्रेस नेता अलका लांबा यांचे.

'आप'ची मोर्चेबांधणी.... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..