आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP To Contest \'maximum\' Seats In 2014 LS Polls

\'मै भी आम आदमी\' लोकसभेसाठी आपचे अभियान, 15-20 राज्यांमध्ये उमेदवार उभे करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकी संबंधीची रणनीती ठरविण्यात आली आहे. बैठकीनंतर पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणूकीसंबंधीची रणनीती जाहीर केली. यादव यांना 'आप'च्या मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते म्हणाले, आम आदमी पार्टी देशातील 15 - 20 राज्यांमध्ये लोकसभेसाठी उमेदवार उभे करणार आहे. पक्ष हरियाणामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढविणार आहे.
पक्षाचे सदस्य वाढवण्यासंबंधी आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यादव म्हणाले, लोकसभा निवडणूकीसाठी देशभरात सदस्य नोंदणीचे व्यापक अभियान सुरु केले जाणार आहे. सध्या सदस्य नोंदणीसाठी घेतले जात असलेले 10 रुपये शुल्कही यापुढे घेतले जाणार नाही. 10 ते 26 जानेवारी दरम्यान 'मै भी आम आदमी' नावाने अभियान चालवले जाणार आहे.
असे निवडले जाणार लोकसभेसाठी उमेदवार
योगेंद्र यादव म्हणाले, 15 ते 20 जानेवारी पर्यंत लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर देशभरातून जसे-जसे उमेदवारांची नावे समोर येतील त्या प्रमाणे यादी जाहीर केली जाईल. उमेदवारांच्या निवडीबद्दल यादव म्हणाले, पक्षाचा सदस्य उमेदवारीसाठी अर्ज करु शकतो. पक्षाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतील, याशिवाय जिल्हा आणि राज्याच्या कार्यालयातही अर्ज उपलब्ध केले जाणार आहे. मिळालेल्या अर्जातून स्वच्छ चारित्र्य आणि प्रामाणिक व्यक्तिंना उमेदवारी दिली जाईल. 15 जानेवारीपर्यंतच उमेदवारीसाठी अर्ज करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपची प्रचार समिती
लोकसभा निवडणूकीसाठी आम आदमी पक्षाने रणनीती तयार केली आहे. निवडणूक प्रचार समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. सध्या या समितीमध्ये योगेंद्र यादव, संजय सिंह आणि पंकज गुप्ता आहेत. लवकरच या समितीचा विस्तार केला जाणार आहे.
घोषणापत्र मार्चमध्ये
योगेंद्र यादव म्हणाले, पक्ष विकास आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लोकसभा लढविणार आहे. त्यासाठीचे घोषणापत्र मार्च मध्ये प्रकाशित केले जाईल.