आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP To Expand In 4 States In Next 5 Yrs: Yogendra Yadav

पाच वर्षांत चार मोठ्या राज्यांत तापणार "आप' ; राष्ट्रीय राजकारणात पर्याय म्हणून उतरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टी देशात मोठा राजकीय पर्याय म्हणून काम करू इच्छिते. त्यामुळे आगामी काळात चार मोठ्या राज्यांत पक्ष जाईल, असे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी रविवारी स्पष्ट केले.
आमचा पक्ष प्रादेशिक पक्ष नाही. पुढच्या काळात राष्ट्रीय पर्याय ठरेल. त्यामुळेच आम्ही दिल्लीला निवडले. राष्ट्रीय राजकारणात मोठी ताकद म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे. तीन ते पाच वर्षांत दिल्ली आणि पंजाबच्या पलीकडे जाऊन आपचे अस्तित्व दिसायला हवे. मोठ्या राज्यांत २० टक्क्यांहून अधिक मते मिळवणे हे पक्षाचे लक्ष्य असेल, असे यादव यांनी सांगितले. परंतु राज्यांची नावे मात्र त्यांनी स्पष्ट केली नाहीत.
दुसरीकडे मात्र पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शपथविधीच्या वेळी भाषणात वेगळीच भूमिका मांडली होती. पाच वर्षे दिल्लीतील नागरिकांची सेवा केली जाईल. इतर गोष्टींकडे लक्ष दिले जाणार नाही, असे सांगून केजरीवाल यांनी स्वकीयांवर टीकाही केली होती.
तिसऱ्या मोर्चात ‘आप’ होणार नाही सहभागी
दिल्लीत ‘आप’चे तृणमूल आणि जदयूने समर्थन केले होते. परंतु कोणत्याही पार्टीसोबत आघाडी करण्याची शक्यता यादव यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, तिसरा मोर्चा ही सुविधा आहे. आप अशा गटात सहभागी होणार नाही.