आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP To Hold Rally Against Modi Govt\'s Land Acquisition Ordinance Today

केजरी ठोकत राहिले भाषण, शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भू-संपादन विधेयक आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आम आदमी पार्टीने (आप) आज (बुधवारी- जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले आहे. या अंदोलना दरम्यान एका व्यक्तीने झाडाला लटकून गळफास घेतला. त्याला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर जंतर-मंतरवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल त्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. परंतु त्यापूर्वीच शेतकर्‍याची प्राणज्योत मालवली होती.
गजेंद्र सिंह असे मृत शेतकर्‍याचे नाव असून तो राजस्थानचा रहिवासी आहे. 'आप'चे आंदोलन सुरु असताना दुपारी दीडच्या सुमारास गजेंद्र सिंह हे झाडावर चढला व त्यांनी आत्महत्येची धमकी दिली. 'आप' नेते कुमार विश्वास यांनी मंचावरुन गजेंद्र सिंह याला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु, त्याने कुमार विश्वास यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत गळफास घेतला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी झाडावर चढून गजेंद्रसिंहला खाली उतरवले आरएमएल रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घो‍षित केले.

'आप' नेत्यांनी सभा थांबवली असती तर त्या शेतकर्‍याचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी दिली आहे.

केजरीवालांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील.
- शेतकरी जमीनी का विकत आहे, याचा धांडोळा सरकारने घेतला पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांसाठी धोरण तयार केले पाहिजे.
- दिल्ली सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हक्टरी 50 हजार रुपेय मदत दिली.
- शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या इच्छेविरुद्ध घेऊ देणार नाही.
- शेतमालाचे नुकसान झाले तर, त्याला एवढा मोबदला दिला पाहिजे की त्यातून त्याच्या कुटुंबाचे वर्षभर पालनपोषण होईल आणि पुढील पीक येईपर्यंत त्याला ते मदत मिळेल. स
शेतकरी कमी कार्यकर्तेच जास्त
सकाळी फार थोड्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. त्याउलट केजरीवाल सरकारने अर्धवेळ शिक्षकांना कायम करण्याच्या घोषणेची पूर्तता अजून केली नाही त्याविरोधात मोठ्या संख्येने शिक्षक जंतर-मंतरवर हजर झाले होते. ते केजरीवाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते.
दिल्ली विधानसभेत 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केलेल्या आपने बुधवारी सकाळी 10.30 वाजता जंतर-मंतर येथे सभेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भाषणानंतर नेते आणि कार्यकर्ते संसदेवर मोर्चा घेऊन जाणार होते. तर, दुसरीकडे दिल्ली सरकारविरोधत अर्धवेळ शिक्षकांचे आंदोलन मोठे दिसत होते. अर्धवेळ शिक्षकांना कायम करावे अशी त्यांची मागणी होती. दिल्लीतील शाळांमध्ये जवळपास 14 हजार अर्धवेळ शिक्षक आहेत. केजरीवाल यांनी निवडणुकीदरम्यान त्यांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'आप'च्या रॅलीत सहभागी शिक्षक आणि मृत शेतकर्‍याची छायाचित्रे...