आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Volunteer Action Manch Challenged Arvind Kejriwal To An Open Debate On “Swaraj

\'आप\' समर्थकांचे केजरींना \'स्वराज\' मुद्यावर चर्चेचे आव्हान, दिली पोलखोलची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल ज्या 'स्वराज'च्या मुद्यावर आक्रमक होत असतात, त्याच मुद्यावर त्यांना चर्चेचे आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आव्हान 'आप'च्याच कार्यकर्त्यांनी दिले आहे. आप व्हॉलेंटिअर अ‍ॅक्शन मंच (एव्हीएएम) नावाने एक गट स्थापन करण्यात आला आहे. 'आप'च्या असंतुष्टांचा हा गट असल्याचे म्हटले जाते. त्यांनी केजरीवाल आणि 'आप'च्या नेत्यांना चर्चेसाठी उपस्थित राहिले नाही तर सर्वांची पोलखोल करण्याची धमकी दिली आहे.
चर्चेचे आव्हान
एव्हीएएमच्या माध्यम संपर्कप्रमुख गीतांजली अग्रवाल म्हणाल्या, 'आम्ही 'आप' नेत्यांना 'स्वराज'वर चर्चेसाठी 24 ऑगस्टची तारीख दिली आहे. आम्ही 'स्वराज'सह इतर कोणत्याही मुद्यावर चर्चेला तयार आहोत. 'आप'च्या कामाची पद्धत कशी असावी हे नव्याने ठरविण्याची वेळ आली आहे. मात्र, ते आम्हालाच बदनाम करुन चर्चेपासून दूर पळत आहेत. 'आप' व्हॉलेंटिअर बद्दलच्या धोरणाची नव्याने समीक्षा करण्यास तयार नाही, आणि चर्चेलाही तयार नाही. यावरुन त्यांची अडेलतट्टू भूमिकाच समोर येत आहे.'
केजरीवाल यांना पत्र
एव्हीएएमने केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की व्हॉलेंटिअर्सने नवी स्वप्ने पाहाण्यास सुरवात केली होती. ते विचारवंत नाहीत, त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी 'आप'वर होती. जेव्हा 'आप'ने 'स्वराज'मुळे तुमचे जीवनच बदलून जाईल असे सांगितले होते, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मात्र, आता तेच संभ्रमावस्थेत दिसत आहेत. त्यामुळे हा संभ्रम दुर करणे गरजेचा आहे.
पोलखोल करण्याची धमकी
एव्हीएएमने 'आप' नेते चर्चेला उपस्थित राहिले नाही तर त्यांची पोलखोल करण्याची धमकी दिली आहे. या गटाचा दावा आहे, की 'आप'च्या नेत्यांची अशी कागदपत्रे आमच्याकडे आहेत, ज्यामुळे ते उघडे पडतील. एव्हीएएमने बुधवारीच पोलखोलची धमकी दिली होती, मात्र आता त्यांनी एक आठवड्याचा कालावधी वाढवून दिला आहे.
एव्हीएएम आपचा भाग नाही
एव्हीएएम आम्ही 'आप'चाच भाग असल्याचे सांगत आहे, तर 'आप'ने एव्हीएएमशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे, की लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष नेतृत्वाने व्हॉलेंटिअर्सचे सर्व म्हणणे वेळोवेळी ऐकले होते. केजरीवाल यांनी देखील पक्षात कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही.