आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Volunteer Posing Himself As A Judge Is Arrested In Gaziyabad

सोमनाथ भारती पत्रकारांना म्हणाले, \'नरेंद्र मोदींनी किती पैसे दिले?\'; नंतर माफीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खिडकी एक्सटेंशन आणि अरुण जेटली व हरिष साळवे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती याआधीही अनेक वादात अडकलेले आहेत. आपने त्यांना तोंडावर बोट ठेवण्याचा दिलेला सल्ला त्यांनी गुंडाळून ठेवला आहे. आता त्यांनी माध्यमांना लक्ष्य करत, 'तुम्हाला नरेंद्र मोदींनी किती पैसे दिले आहेत? असा प्रश्न विचारला. मात्र, नंतर त्यांनी माफी मागितली. सोमनाथ भारती म्हणाले, 'मी माझे वक्तवय मागे घेतो. माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागतो.'
याआधी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांचे नाव घेऊन त्यांच्या थुकन्याची इच्छा होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आपने खेद व्यक्त केला होता आणि भारती यांना यापुढे असे असंसदीय वक्तव्य करु नये असा सल्ला दिला होता.
सुत्रांची माहिती आहे, की 'आप' कान टोचल्यानंतरही जर भारती त्यांच्या भाषेत बदल करणार नसतील तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करु शकतो. विरोधकांबरोबरच त्यांच्याच पक्षातील अनेक सदस्य त्यांना पदावरुन दूर करणयासाठी आग्रही आहेत. त्यांच्याविरोधात परदेशी महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर पक्ष मात्र त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. त्यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचे आपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडमध्ये, न्यायाधीश असल्याचा बनाव करुन लोकांना गंडा घालणारा 'आप'चा सदस्य जेरबंद