आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Volunteer Sunil Kumar Lal Says, Dont Use The Logo Which Designed By Me News In Marathi

AAPचा व्हॉलेंटियर म्हणाला, मी बनवलेला LOGO आता पक्षाने वापरु नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना गिफ्ट मिळालेली कार चर्चेत आली असताना 'आप'च्या 'लोगो'वरून नवा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचा (आप) 'लोगो' आपण बनवला असून यापूढे तो पक्षाने वापरू नये, असे व्हॉलेंटियर सुनील कुमार लाल याने म्हटले आहे. या संदर्भात सुनील लाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्रही लिहिले आहे.
लखनऊ येथील रहिवासी सुनील कुमार लाल यांनी सांगितले की, 'आप'चा 'लोगो' मी डिझाइन केला आहे. मात्र, आता मला या पक्षात राहायचे नाही. त्यामुळे 'आप'ने माझा प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा स्विकारावा. तसेच यापुढे मी बनवलेल्या लोगोचा वापर बंद करावा. ब्रांडिंग, स्टेशनरी, वेबसाइट, बॅजेस, फ्लॅग्ज, पोस्टर, हँडबिल्स आणि बॅकड्रॉपवरून हा 'लोगो' काढून टाकावा.
सुनील कुमार लालने 2013 मध्ये 'आप'चे सदस्यत्त्व स्विकारले होते. परंतु त्याची पावती गहाळ झाली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, माझी कार परत द्या, गिफ्ट देणार्‍या व्यक्तीची मुख्यमंत्री केजरीवालांकडे मागणी