आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Warn Member Not To Attend Meeting Called By Yogendra

स्वराज संवादा'त सहभागी व्हाल तर खबरदार!, आप'चा सदस्यांना इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे असंतुष्ट नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी बोलावलेल्या बैठकीत पक्ष सदस्यांनी सहभागी न होण्याचा इशारा आपने सोमवारी दिला.
बंडखोरांचे निमंत्रण स्वीकारणा-या ंविरुद्ध काेणती कारवाई केली जाईल याचा निर्णय पक्षाची वरिष्ठ समिती घेईल, असे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे.

आपचे वरिष्ठ नेते संजय सिंह म्हणाले, आपची राजकीय समिती (पीएसी) व कार्यकारिणी(एनई) गुडगावमध्ये मंगळवारी होणा-या "स्वराज संवाद' बैठकीनंतर पुढील निर्णय घेईल. "स्वराज संवाद' हा पक्षाचा कार्यक्रम नाही. पीएसी आणि एनई बैठकीत सहभागी होणा-या सदस्यांविरुद्ध कारवाईचा निर्णय घेईल. भूषण आणि यादव यांना पक्षाने गेल्या महिन्यात पक्षाच्या धोरणात्मक निर्णय घेणा-या समितीमधून बडतर्फ केले आहे.