आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AAP Will Get Mejority In Dilhi Election : Survey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

35 जागा मिळवत AAP सर्वात मोठा पक्ष, लोकप्रियतेतही केजरीवाल पुढे : SURVEY

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आलेल्या एबीपी न्यूज-नीलसन ताज्या सर्वेक्षणानुसार आपला बहुमतासाठी केवळ एक जागा कमी पडत असल्याचे दिसते आहे. बहुमतासाठी 36 जागा गरजेच्या असून आपला 35 जागा मिळत असल्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात येतोय.

सर्वेक्षणानुसार आपला सर्वाधिक 35, भाजपला 29, काँग्रेसला-6 आणि इतरांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही आप, भाजपच्या पुढे आहे. सर्वेक्षणानुसार आपला 37 टक्के, भाजपला 33, काँग्रेसला 18 आणि इतरांना 12 टक्के मते मिळतील. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठीही 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना किरण बेदींच्या तुलनेत अधिक पसंती आहे. केजरीवाल यांना 48 टक्के तर बेदी यांना 42 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अजय माकन यांना केवळ सात टक्के लोकांनी पसंती दर्शवली.

सर्वेक्षणातील इतर अंदाज
दिल्लीत सर्वात लोकप्रिय नेता कोण?
नरेंद्र मोदी-46%
अरविंद केजरीवाल-43%
राहुल गांधी-5%

मोदींच्या 8 महिन्यातील काम कसे होते?
खूप चांगले - 25
चांगले - 33
सरासरी - 27
वाईठ - 9

अण्णांना कोणी दगा दिला?
अरविंद केजरीवाल - 20%
किरण बेदी - 18%
दोघांनी - 23%
कोणीही नाही - 26%

किरण बेदी-केजरीवालांशी चर्चा टाळत आहेत का?
हो - 42%
नाही - 42%
माहिती नाही - 16%

किरण बेदींनी केजरीवालांच्या विरोधात लढायला हवे का?
हो - 41%
नाही - 43%
माहिती नाही - 16%
असे झाले सर्व्हेक्षण
हे सर्वेक्षण 25 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान करण्यात आले.
सर्वेक्षणासाठी दिल्लीतील सुमारे सहा हजार मतदारांची मते जाणून घेण्यात आली.

पुढील स्लाइड्वर वाचा, दिल्लीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणांचे अंदाज...