Home »National »Delhi» AAP Youth Wing Leader Arrested For Robbery Party Denies Link

25 लाखांच्या दरोड्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्याला अटक, पक्षाने झटकले हात

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 16:45 PM IST

नवी दिल्ली- 25 लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्यासह 6 आरोपींना अटक केली आहे. आरोपी नजीब हा आपच्या यूथ विंगचा नेता असल्याची माहिती मिळाली आहे. नजीब याच्याकडे जाफ्राबादच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. याप्रकरणी आपने मात्र हात झटकले आहे. नजीब याच्याशी पक्षाचा काही एक संबंध नसल्याचे आपचा सूत्रांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आप गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. आपमधील गुन्हेगार नेत्यांवर केजरीवाल कारवाई करणार काय ? असा सवाल मनोज तिवारी यांनी केला आहे.
फायरिंग करून आरोपींनी केली लूट...
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीब आणि त्याच्या साथीदारांनी जाफ्राबाद भागात 12 मार्चला एका व्यावसा‍ियकाकडे 25 लाखांचा दरोडा टाकला होता. आरोपींनी गोळीबारही केला होता. 25 लाख रुपये भरलेली बॅग, मोबाइल आणि दस्ताऐवज आरोपींनी लांबवले होते. आरोपींनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला होता.
- सजग नागरिकांनी एका आरोपीला पकडले होते. इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. नंतर पोलिसांनी एक एक करून सर्व आरोपींना जेरबंद केले होते. पोलिसांनी आरोपीकडून 16 लाख रुपये, पिस्तूल आणि एक बाईक जप्त केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... आरोपीशी काही घेणे देणे नाही- आप

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended