आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामलीलावर ‘आपकी कसम’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामलीला मैदान... 1850 मध्ये इंद्रपत गाव होते. 163 वर्षांमध्ये या गावाने अनेक गोष्टी पाहिल्या. गावाजवळचे शेत आणि नंतर त्याचे झालेले मैदान. येथे रामलीला कार्यक्रम होऊ लागले. या मैदानाने राजकीय पक्षांच्या सभा व आंदोलने अनुभवली. अनेक सभांनी राजकारणाची दिशा बदलली. आंदोलनामुळे लोकांचा आवाज बुलंद केला. शनिवारी याच मैदानावर आपचे केजरीवाल यांनी दिल्लीच्या सातव्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदान बदलाचे साक्षीदार ठरले तर जनता आम आदमीने दिलेल्या आश्वासनाची.
10.53 वा. सकाळी
अरविंद कौशंबी मेट्रो स्थानकावर पोहोचले. हजारोंच्या संख्येने समर्थक आणि लोकांची गर्दी होती.
11.56 वा. सकाळी
केजरीवाल यांनी दिल्लीच्या सातव्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 12:16 वाजता त्यांनी लोकांसमोर भाषण केले.
12.42 वा. दुपारी
आम आदमी पार्टीच्या संयोजकांनी राष्‍ट्रापिता महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळी जाऊन स्वराज्यासाठी आशीर्वाद घेतले.
शास्त्री यांच्या नातूचा अ‍ॅपलची नोकरी सोडून आपमध्ये प्रवेश
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अ‍ॅपलची नोकरी सोडली आहे. त्यांना तेथे वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वेतन होते. आदर्श यांचे वडील अनिल शास्त्री कॉँग्रेसमध्ये आहेत. मला अरविंद यांच्यापासून प्रेरणा मिळाली. उपजीविकेसाठी छोटी दूरसंचार कंपनी सुरू करेन, असे ते म्हणाले.
आता गुजरात सरकारविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम
गांधीनगर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ‘आप’ आपले संयोजक अरविंद केजरीवाल यांना प्रोजेक्ट करेल. आपच्या गुजरात शाखेचे प्रमुख सुखदेव पटेल यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत आप भाजपला लढत देईल, असे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या आपने याआधीच गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागा लढवण्याचे जाहीर केले. आप गुजरात सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडेल. यासाठीचा कार्यक्रम तयार आहे. गुजरातमधील 70 नागरिकांनी आपचे सदस्यत्व स्वीकारल्याचा दावा त्या पक्षाने केला आहे.
भिवानीतून चौथे मुख्यमंत्री
अरविंद मूळचे हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील. जिल्ह्याने बन्सीलाल, बनारसी दास आणि हुकूमसिंह यांच्यासारखे मुख्यमंत्री दिले. हे तिघेही हरियाणाचे मुख्यमंत्री होते.
आयआयटीचे दुसरे मुख्यमंत्री : केजरीवाल आयआयटीतील दुसरे मुख्यमंत्री आहेत. त्या अगोदर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आयआयटी मुंबईचे विद्यार्थी होते.
सोशल मीडिया
० केजरीवाल मुख्यमंत्री होताच देशात आता जनतेचे राज्य येईल, हे निश्चित.
- विजय मल्ल्या
० आपची कॅबिनेट देशातील सर्वात तरुण कॅबिनेट.
- बरखा दत्त
० दिल्ली आमची झाली, आता हरियाणाची वेळ.
- योगेंद्र यादव
० राहुल व सोनिया आपमध्ये कधी सहभागी होणार आहेत. त्यांचे समर्थन काँग्रेसमधील घोटाळ्यांचा पर्दाफाश करेल.
- गुरुराज एस.
० काँग्रेसचे समर्थन घेऊन आपचे भ्रष्टाचाराशी लढणे म्हणजे आयएसआयने दहशतवाद्यांशी लढण्यासारखे.
-अंकित जायस्वाल
केजरीवालांचे वडिलोपार्जित घर
पडझड झालेल्या भिंती आजही
प्रामाणिकपणाची शपथ घेतात
हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील खेडा नावाचे गाव. केजरीवाल यांचे कुटुंब भिवानीच्या सिवनी गावातून येथे आले होते. केजरीवाल यांचा शपथग्रहण समारंभ खेडाच्या ग्रामस्थांनी टीव्हीवर पाहून आनंद साजरा केला. येथेच त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. आता ते खंडहर बनले आहे; परंतु त्याच्या भिंती मात्र अजूनही प्रामाणिकपणाची साक्ष देतात. विश्वासाचे सिमेंट व विचारांच्या विटा येथे लावल्यासारख्या वाटतात. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याचे पाहून माझी छाती गर्वाने फुगली आहे, असे गावातील बुजुर्ग ताराचंद शर्मा म्हणाले. केजरीवाल यांचे आजोबाही एवढेच प्रामाणिक होते.
अरविंद केजरीवाल यांच्यावर आंतरराष्ट्रीय मीडियाचेही लक्ष
खलीज टाइम्स (दुबई)
शपथविधी समारंभाला जाण्यासाठी मेट्रोने जाण्याचे पाऊल चांगले असल्याचे म्हटले आहे. वृत्तपत्राने केजरीवाल यांना भारतीय राजकारणाचा नैतिक चेहरा म्हटले आहे.
वॉशिंग्टन पोस्ट (अमेरिका)
केजरीवाल यांच्या मते आम आदमी पार्टीचे सरकार येणे म्हणजे सामान्य माणसाचा विजय आहे. आता अरविंद आणि टीमला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सज्ज राहावे लागेल.
द डॉन (पाकिस्तान)
आपचे यश पाहून आता पाकिस्तानातही लोक असेच काही करण्याचा विचार करू लागले आहेत. असा पक्ष स्थापन करावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्या, अशी पत्रे येऊ लागली आहेत.
बीबीसी (ब्रिटन)
केजरीवाल भारतीय राजकारणातील नवीन नेते. त्यांचे मूळ गाव आणि कुटुंबावर लेख लिहिला आहे. गावातील लोक केजरीवालांना जगातील सर्वात प्रामाणिक व्यक्ती मानतात.
आपचे मंत्री आणि त्यांचे मंत्रालय
अरविंद केजरीवाल : गृह, अर्थ, नियोजन, वीज आणि सतर्कता
राखी बिर्ला (26)
महिला व बालकल्याण
शिक्षण : पत्रकारितेमध्ये पीजी.
० सर्वात कमी वयाच्या
मंत्री. आई सफाई कर्मचारी असलेल्या सरकारी शाळेत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले.
मनीष शिसोदिया (41)
सा. बांधकाम, शिक्षण
शिक्षण : पत्रकारितेत डिप्लोमा.
० अरविंद यांचे सर्वात विश्वासू. उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यात जन्म. लोकांची खूप कामे करून ओळख निर्माण केली.
सत्येंद्र जैन (49)
आरोग्य
व उद्योग
शिक्षण : आर्किटेक्चर
० सीपीडब्ल्यूडीमध्ये नोकरी. अण्णांच्या आंदोलन काळात जैन यांची ओळख बनली. त्यानंतर चळवळीत सक्रिय सहभाग.
गिरीश सोनी (49)
एससी/एसटी, कामगार
शिक्षण : बारावी उत्तीर्ण
० मादीपूरमध्ये लेदर उद्योग. गरीब परिस्थितीमुळे पदवी पूर्ण करू शकले नाहीत. औद्योगिक पदविका घेऊन उद्योगाला सुरुवात.
सौरभ भारद्वाज (34)
परिवहन, अन्नपुरवठा
शिक्षण : बी. टेक, एलएलबी
० बहुराष्‍ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून अण्णांच्या आंदोलनात. पूर्वी गरीब समुदायातील लोकांना मदत करण्यात पुढाकार.
सोमनाथ भारती (39)
पर्यटन व सांस्कृतिक
शिक्षण : एलएलबी, एमएस्सी
० बिहारचा जन्म. 1992 मध्ये दिल्लीत आगमन.
० जनहित याचिकांच्या साह्याने नागरिकांना मदत करण्यात पुढाकार.