आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aarushi Hemraj Double Murder By Rajesh And Nupur Talwar

डॉ.तलवार दाम्पत्याकडूनच आरुषी-हेमराजची हत्या; पोलिस अधीक्षकांची साक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोयडा- देशात खळबळ उडवून देणार्‍या बहुचर्चित आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडाचा नवा खुलासा समोर आला आहे. आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडप्रकरणी सीबीआयचे पोलिस अधीक्षक ए.जी.एल कौल यांनी गाझियाबाद कोर्टात सांगितले की, डॉ.राजेश आणि नुपूर तलवार आरुषि आणि हेमराज यांची हत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या बंगल्यात कोणीही प्रवेश केलेला नव्हता. बाहेरील व्यक्तीचे हे काम नसून तलवार दाम्पत्यांनेच हे हत्याकांड घडवून आणले असल्याची साक्ष कौल यांनी कोर्टात दिली.

यापूर्वी सीबीआयने इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, गांधीनगरचे डेप्युटी डायरेक्टर महेंद्रसिंग दहिया यांनी कोर्टात सांगितले होते की, आरुषी आणि हेमराज हत्‍याकांडात बाहेरच्या व्यक्तीचा हात असूच शकत नाही. त्यामुळे संशयाची सुई तलवार दाम्पत्याकडे सरकली होती.

डॉ.दहिया यांच्यानुसार, आरुषि आणि हेमराज या दोघांवर आरुषीच्या खोलीत हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हेमराजचा मृतदेह घराच्या छतावर नेण्यात आला होता. 26 सप्टेंबर 2009 रोजी सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर यांनी ईमेलच्या माध्यमातून आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांड प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार 09 ऑक्टोबर 2009 रोजी सीबीआयचे पथक घटना स्थळी पोहचले होते. तेव्हा घराला रंग देण्याचे काम सुरु होते.