आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरुषी-हेमराज खून प्रकरणाचे गुढ का वाढले; तपासात राहिल्या या त्रुटी; 7 कारणे आली समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉयडा येथील जलवायु विहार येथील फ्लॅटमध्ये आरुषी आणि हेमराज यांचा खून झाला होता. - Divya Marathi
नॉयडा येथील जलवायु विहार येथील फ्लॅटमध्ये आरुषी आणि हेमराज यांचा खून झाला होता.
नवी दिल्ली- आरुषी-हेमराज खून प्रकरणात तलवार दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी गाझियाबाद येथील डासना जेलमधुन बाहेर आले. चार वर्षाची सजा भोगल्यावर राजेश आणि नूपुर तलवार यांना अलाहाबाद हायकोर्टाने सर्व आरोपांमधुन मुक्त केले. तर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना मुलीच्या आणि नोकराच्या खूनाचे दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता 9 वर्षानंतर पुन्हा प्रश्न उभा राहिलाय की आरुषीचा खून कुणी केला? पहिल्यादा उत्तर प्रदेश पोलिसांनी आणि नंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास पण ते या खूनाचे गुढ पु्र्णपणे उकलण्यात अपयशी ठरले.
 
Divyamarathi.com कडे या प्रकरणाशी निगडित महत्वपुर्ण कागदपत्रे उपलब्ध आहेत. या प्रकरणाच्या तपासात 7 मोठ्या त्रुटी समोर आल्या. 

1) तपासाच गांभीर्याने तपास करण्यात आला नाही.
- सीबीआयने याबाबतच्या अहवालात उल्लेख केला आहे की, जेव्हा बेडरुममध्ये आरुषीची बॉडी सापडली तेव्हा तिच्या डाव्या हातावर लाल निशाण होते. ते दबाव टाकण्यामुळे बनले होते. पैजामा उतरलेला होता आणि कमरे खालचा हिस्सा दिसत होता. याचाच अर्थ कोणीतरी तिच्यासोबत जबरदस्ती केली होती, असा निघत होता.
- आरुषीच्या खोलीला आणि तिच्या डेडबॉडीला पोलिसांनी केवळ एका नजरेत पाहिले. त्या खोलीच्या भिंतीवर खूनाचे डाग होते. खूनाचा गांभीर्याने करण्याऐवजी पोलिसांनी हेमराज आणि आरुषीच्या संबंधावरच अधिक लक्ष केंद्रित केले.
 
2) हेमराजबद्दल शंका होती, पण त्याच्या खोली तपासलीच नाही
- आरुषीचा खून झाला त्यावेळी हेमराज बेपत्ता होता. पोलिसांना सगळ्यात पहिला संशय त्याच्यावरच होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या खोलीची झ़डती घेणे गरजेचे होते पण पोलिसांनी तसे केले नाही.
- पोलिसांना त्याच्या खोलीत नंतर एक वाईन, बीयर आणि कॉल्ड ड्रिकची बॉटल, तीन रिकामे ग्लास मिळाले होते. याच अर्थ त्या खोलीत 3 हून अधिक लोक होते पण त्याबाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
3) खून झालेल्या दिवशी हेमराजने जेवण केले नव्हते, याचाही तपास झालाच नाही
- 16 मे 2008 रोजी आरुषीचा खून झाल्याचे उघड झाले होते. तपासात समोर आले की 15 मे रोजी हेमराजने जेवण केले नव्हते. त्याचे जेवण किचनमध्ये ठेवलेले आढळले होते. याचाच अर्थ तो रात्री कोणाचीतरी वाट पाहत होता. 17 मे रोजी त्याचा मृतदेह सापडला दलवार दाम्पत्याच्या फ्लॅटच्या छतावर आढळला होता. त्याच्या एका पायात चप्पल होती, तर दुसरी चप्पल दुर पडली होती. याचाच अर्थ तो स्वत:हून गच्चीवर गेला होता.
- डॉ. राजेश यांचा कंपाउंडर कृष्णाने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, हेमराज रात्री बिडी पिण्यासाठी गच्चीवर गेला होता. त्याने जेवणही केले नव्हते. सीबीआयने याचा तपासात विचार केला नाही.
 
4) आरुषीच्या खूनानंतर सकाळी 6 वाजता हेमराजच्या नंबरवर कुणी कॉल स्वीकारला?
- 16 मे रोजी सकाळी तलवार यांच्या घरी त्यांची मोलकरीण भारती आली होती. त्यावेळी हेमराज घरी नव्हता. डॉ. नूपुर यांनी आपल्या लॅंडलाइनवरुन हेमराजच्या मोबाईलवर कॉल केला होता. हेमराजचा फोन 9 सेकंदासाठी उचलण्यात आला होता. तो कुणी उचलला हे कळालेच नाही.
- जर तलवार दाम्पत्य खूनी होते तर त्यांनी कॉल का केला आणि तो कुणी उचलला हे समजु शकले नाही.
 
5) शवविच्छेदन अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले
- सीबीआयने दावा केला की, आरुषीच्या खोलीत हेमराजला मारण्यात आले. आरुषीच्या खोलीत घेण्यात आलेले रक्ताचे नमूने, आरुषी आणि हेमराजच्या कपड्याची तपासणी यात वेगवेगळे अहवाल समोर आले.
- सीएफएसएल दिल्लीच्या 19 जूनच्या अहवालात म्हटले आहे की, आरुषीच्या बेडशीट आणि वस्तूंवर हेमराजचा डीएनए अथवा ब्लड सॅम्पल सापडले नाही. हेमराजच्या कपड्यावरही आरुषीचे रक्त सापडले नाही. सीडीएफडी हैदराबादच्या डीएनए एक्सपर्टनी सांगितले की,  खोलीत फक्त आरुषीचा डीएनए सापडला.  
    
6) कृष्णाच्या गादीवर हेमराज रक्त कसे सापडले याचा तपासच झाला नाही.
- कृष्णाच्या गादीवर हेमराजचे रक्त सापडले होते. यावर सीबीआयने ही टायपिंगची चूक असल्याचे म्हटले होते. हा प्रश्नच आहे की हेमराजचे रक्त कृष्णा खोलीपर्यंत कसे पोहचले.

7) शवविच्छेदन अहवालात आणि डॉक्टराच्या जबाबात विरोधाभास
- उत्तर प्रदेश पोलिसांनी आरुषीचे पोस्टमार्टम केले होते. त्यात तिच्यासोबत कोणतीही जबरदस्ती झाली नव्हती असे म्हटले होते. पण नंतर पीएम करणाऱ्या डॉक्टर सुनील दोहरे यांनी सीबीआय कोर्टात सांगितले की, आरुषीच्या शरीराच्या बाह्य परिक्षणात आढळले की तिची वैजाइनल कॅविटी उघडी होती. डॉक्टर दोहरे यांच्या या जबाबाने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...