Home | National | Delhi | Aarushi Parents Rajesh And Nupur Talwar Did Not Kill Daughter Allahabad High Court

9 वर्षांपासून सस्पेन्स: आरुषिची हत्या कोणी केली? CBI कोर्टाने 7 आधारांवर दिली होती जन्मठेप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 05:09 PM IST

परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन शिक्षा होऊ शकत नाही. कोर्टाने आरोपींची बाजू शांततेने ऐकून घेतली.

 • Aarushi Parents Rajesh And Nupur Talwar Did Not Kill Daughter Allahabad High Court
  नवी दिल्ली - देशभर गाजलेल्या आरुषि हत्या प्रकरणात हायकोर्टाने तिचे आई-वडील नुपूर आणि राजेश तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने म्हटले, आहे की परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन (circumstantial evidence) शिक्षा होऊ शकत नाही. कोर्टाने आरोपींची बाजू शांततेने ऐकून घेतली आणि सीबीआयच्या सर्व दाव्यांची पाहाणी केली. हे सर्व पुरावे आरुषिचे आई-वडील निर्दोष असल्याकडेच इशारा करत होते.

  सीबीआय कोर्टाने या 7 आधारांवर सुनावली होती जन्मठेप... त्यावर हायकोर्टाने प्रश्न उपस्थित केले.
  1 - सीबीआयचा दावा - डॉ. राजेश आणि नुपूर तलवार यांनी त्यांच्या मुलीचा आरुषिचा खून केला.
  - सीबीआयने 29 डिसेंबर 2010 ला आरुषि मर्डर केसमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. जर ते मुलीच्या खूनी होते तर ते क्लोजर रिपोर्टच्या विरोधात कोर्टात का गेले?
  2 - सीबीआयचा दावा - आरुषिच्या बेडरुममध्ये हेमराज आणि आरुषि शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते. तिथेच डॉ. राजेश यांनी हेमराजची हत्या केली.
  - घटनास्थळावरुन तपास यंत्रणेला 24 फिंगर प्रिंट मिळाले. मात्र त्यामध्ये हेमराजचे फिंगर प्रिंट मिळाले नाही. जर, डॉ. राजेश याने हेमराजचे फिंगर प्रिंट मिटवून टाकले असेल तर त्याला कसे कळाले की यातील हेमराजे फिंगर प्रिंट कोणते आहे?
  3 - सीबीआयचा दावा - आरुषिच्या रुममधून आवाज ऐकून डॉ. राजेश तलवार हेमराजच्या रुममध्ये गेले, हेमराज तिथे सापडला नाही तेव्हा ते आरुषिच्या रुमकडे गेले.
  - जर आवाज आरुषिच्या रुममधून येत होता तर डॉ. तलवारने मुलीचे दार वाजवले पाहिजे होते. त्याऐवजी ते आरुषिच्या रुमपासून 40-50 फूट दूर टेरेसवरील सर्व्हंट रुमकडे कशासाठी गेले? जर पित्याने मुलीच्या रुममधून आवाज ऐकला तर स्वाभाविक प्रतिक्रिया ही मुलीच्या रुमकडे धाव घेणे राहिली असती.
  4 - सीबीआयचा दावा - हेमराज आणि आरुषिला आक्षेपार्ह्य स्थितीत पाहिल्यानंतर डॉ. राजेश तलवारने हेमराजवर गोल्फस्टिकने वार केला, मात्र हेमराजला चाहूल लागल्याने तो बाजूला झाला आणि गोल्फस्टिक आरुषिच्या डोक्यात घुसली.
  - या घटनेचे कोर्टात रिकंस्ट्रक्शन करण्यात आले. मात्र त्यात ऐवढा मोठा घाव बसला नाही, त्यावरुन हे स्पष्ट झाले की गोल्फ स्टिकने एवढा मोठा घाव होऊ शकत नाही, असे का?
  5 - सीबीआयचा दावा - आरुषिच्या बेडरुममध्ये हेमराजची हत्या केल्यानंतर तलवार दाम्पत्याने त्याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून ओढत छतावर नेला.
  - न्यायालयासमोर या घटनेचीही पुनरावृत्ती करण्यात आली. मात्र चादरीत गुंडाळून मृतदेह पायऱ्यावरुन ओढून नेत असताना जशा जखमा झाल्या तशा जखमा हेमराजच्या शरीरावर आढळल्या नाही.
  6 - सीबीआयचा दावा - डॉ. राजेश तलवारने हेमराजची हत्या आरुषिच्या बेडरुममध्ये तिच्या बेडवर केली.
  - हेमराजचे रक्त आरुषिच्या उशीवर सापडले नाही. तर त्याच्या रक्ताचे निशाण त्याच्या रुममध्ये त्याच्या उशीवर सापडले.
  7 - सीबीआयचा दावा - सीबीआय परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सिद्ध करते की आरुषिचा खून तिच्या आई-वडिलांनी केला.
  - तलवार दाम्पत्यांच्या नार्को टेस्टमध्ये त्यांनी खून केल्याचे का समोर आले नाही?
  >हेही वाचा
 • Aarushi Parents Rajesh And Nupur Talwar Did Not Kill Daughter Allahabad High Court
 • Aarushi Parents Rajesh And Nupur Talwar Did Not Kill Daughter Allahabad High Court
 • Aarushi Parents Rajesh And Nupur Talwar Did Not Kill Daughter Allahabad High Court
 • Aarushi Parents Rajesh And Nupur Talwar Did Not Kill Daughter Allahabad High Court

Trending