आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abbu Ammi Did Not Got Power For Hole Life, Says Abdul Kalam

अब्बू-अम्मीला हयातभर वीज मिळाली नव्हती : अब्दुल कलाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माझ्या पालकांना आजन्म २४ तास विजेची उपलब्धता नव्हती. त्यासाठी मी काही करू शकलो नाही. माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी खंत व उणीव असल्याचे माजी राष्ट्रपती आणि भारताच्या अणुऊर्जा धोरणाचे शिल्पकार ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणाले.प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त हा आपल्या पालकांचा मूळ स्वभाव होता. आपल्या ९९ वर्षीय भावाला आज रामेश्वरम (तामिळनाडू) येथील घरात २४ तास विजेची सुविधा मिळते याबद्दल कलामांनी समाधान व्यक्त केले. हे तंत्रज्ञानाचेच वरदान असल्याचे ते म्हणाले.

ए.पी.जे. अब्दुल कलामांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे वडील १०३ वर्षे, तर आई ९३ वर्षे जगली. ९९ वर्षीय भाऊ ए.पी.जे. माराईकायार रामेश्वर येथील निवासात राहतो. त्यांच्या घराला २४ तास वीजपुरवठा असतो. आनंद कलामांनी व्यक्त केला.

तरुणांसाठी पुस्तक
सायंटिफिक पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर’ या नव्या पुस्तकाचे लेखन कलामांनी नुकतेच पूर्ण केले. सहलेखक व मदतनीस सृजन पाल सिंह यांच्यासोबत मिळून हे लेखन त्यांनी केले आहे. या पुस्तकात त्यांच्या खासगी जीवनातील बरेच प्रसंग शब्दचित्रित केले आहेत. शिवाय तरुणांसाठी राेबोटिक्स, विमानशास्त्र, न्यूरोसायन्स, पॅथॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्यासाठीचा सल्लाही कलामांनी दिला आहे. या पुस्तकासाठी लेखकद्वयींनी ९ वर्षे मेहनत घेतली.