आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले, काश्मिरी खुश असल्यास त्यांनी भारतातच राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित - Divya Marathi
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित
इस्लामाबाद/नवी दिल्ली - कोझीकोडेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्यामुळे पाकिस्तान भडकला आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा निर्यातक आहे हे पंतप्रधान मोदी यांचे विधान चुकीचे आहे, असे इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मोदींचे भाषण म्हणजे काश्मीर मुद्द्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टिप्पणीही पाकने केली आहे. दुसरीकडे, भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे की, युद्ध हा तोडगा होऊ शकत नाही, काश्मिरी नागरिकांना आपले भविष्य निवडण्याची निष्पक्ष संधी द्यावी, जर ते भारतात राहण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांना तेथेच राहू द्यावे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी एक वक्तव्य जारी करून म्हटले की, ‘जगाचे लक्ष काश्मीर मुद्द्यावरून वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिप्पणी ही पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्याचा नियोजनबद्ध भाग आहे. हे बेजबाबदार वर्तन दुर्दैवी आहे. ’
मोदींनी कोझीकोडेच्या सभेत पाकिस्तान आणि तेथील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला होता. १८ जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडू, असे त्यांनी म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...