आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abdul Kalam Passes Away Last Rites From Shilong To Delhi

या सुरक्षा रक्षकाशी झाली होती डॉ. अब्दुल कलामांची अखेरची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलामांच्या पायलट कारवर या जवानाची ड्यटी होती. कलामांनी सोमवारी शिलाँगमध्ये त्याची भेट घेतली. - Divya Marathi
कलामांच्या पायलट कारवर या जवानाची ड्यटी होती. कलामांनी सोमवारी शिलाँगमध्ये त्याची भेट घेतली.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे शिलाँगमध्ये सोमवारी निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेल्या कलामांचे साधेपण हाच त्यांच्या जीवनाचा सिद्धांत होता. सोमवारी त्यांनी गुवाहाटी येथून कारने शिलाँग पर्यंतचा प्रवास केला. डोंगर घाटांतून त्यांनी 110 किलोमीटरचा प्रवास दुपारी 2.30 वाजता सुरु केला आणि सायंकाळी 5.45 दरम्यान ते आयआयएम शिलाँगच्या गेस्ट हाऊस येथे पोहोचले.
जवानाला भेटले
कलामांना शिलाँगमध्ये एका जवानाला भेटण्याची इच्छा होती. त्यांनी शिलाँगला जाण्यापूर्वीच तशी इच्छा व्यक्त केली होती. हा जवान त्यांच्या पायलट कारचा चालक होता. त्यानेही कलामांना भेटण्यासाठी अडीच तास उभे राहून त्यांची वाट पाहिली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ट्विटर हँडलवरुन या भेटीची माहिती देण्यात आली आणि फोटो देखील शेअर करण्यात आले आहे. In memoryof Dr.Kalam ‏@APJAbdulKalam ने ट्विट केले आहे, पायलट कारमध्ये अडीच तास उभे राहाणाऱ्या जवानाला भेटण्याची कलामांनी इच्छा व्यक्त केली होती. हीच त्यांची शेवटची भेट ठरली.
सोमवारी शिलाँगमध्ये व्याख्यान देत असतानाच कलामांचे ह्रदय बंद पडले आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे त्यांचे निधन झाले.
(तेव्हापासून आतापर्यंत काय झाले, लाइव्ह अपडेट साठी येथे क्लिक करा )

गुवाहाटीमध्ये हजारो लोकांनी वाहिली श्रद्धांजली
कलाम यांचे शिलाँगमध्ये सोमवारी रात्री निधन झाले, ही बातमी कळाल्यानंतर हजारो लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांचे पार्थिव हॉस्पिटलबाहेर आणल्यानंतर हजारो लोकांच्या अश्रूचा बांध फुटला. तिथे जमा झालेल्या लोकांनी कलाम झिंदाबाद, कलमा अमर रहेच्या घोषणा दिल्या. कलामांचे पार्थिव हॉस्पिटलमधून बाहेर घेऊन येणाऱ्या जवानांच्या आणि अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले होते. सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत शिलाँगचे लोक कलामांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर हजर होते.

मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव गुवाहाटी येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. त्यानंतर दिल्लीत त्यांचे घरी पार्थिव येण्याआधीच तिथेही लोकांनी मोठी गर्दी केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कलामांनी घेतली जवानाची भेट