आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामांनी नाकारली होती वाजपेयींची ऑफर, पोखरण चाचणीत होते स्पेशल कोड नेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. कलाम, हातात फाइल असलेले आर.चिदम्बरम आणि  के. सांथानाम. - Divya Marathi
डॉ. कलाम, हातात फाइल असलेले आर.चिदम्बरम आणि के. सांथानाम.
नवी दिल्ली - भारताचे मिसाइल मॅन अर्थात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पोखरण मध्ये झालेल्या अणु चाचणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी कलामांची भेट घेतली होती. तेव्हा कलाम पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वाजपेयींनी त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र कलामांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी कलाम आणि अणु उर्जा प्रकल्पाचे अध्यक्ष आर. चिदंबरम यांनी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भेट घेतली. या भेटीत कलामांनी न्यूक्लिअर मिसाइल प्रोग्रामबद्दल माहिती दिली.

वाजपेयी आणि कलामांच्या या बैठकीत अणु चाचणी कार्यक्रमाच्या तयारीला हिरवा कंदिल देण्यात आला. त्याला 'ऑपरेशन शक्ती' नाव देण्यात आले. तर, कलामांचे कोड नेम 'मेजर पृथ्वीराज' ठेवण्यात आले. डॉ. कलामांसह त्यांचे काही सहकारी आणि वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, प्रमोद महाजन, जसवंतसिंह आणि यशवंत सिन्हा याच लोकांना या कार्यक्रमाची माहिती होती. पोखरण चाचणीची तयारी करीत असताना अमेरिकेच्या सॅटेलाइटपासून दुर राहाण्यासाठी कलामांसोबत त्यांचे सर्व शास्त्रज्ञ सहकारी लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये काम करत होते.
अमेरिकन सॅटेलाइटच्या दृष्टीक्षेपात आपण येऊ नये यासाठी बहुतेकदा ते आपल्या टीमसोबत रात्रीच्यावेळी काम करत असायचे. साइटवर जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरत होते. एकाच मार्गावरुन त्यांनी जास्त प्रवास केला नाही. अखेर 11 आणि 13 मे 1998 रोजी अणु चाचणी घेण्यात आली. त्यानंतर कलामांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'डीआरडी आणि अणु ऊर्जा प्रकल्प विभागाने आपल्या तंत्रज्ञानाने देशाला आण्विक हल्ल्याविरोधातील एक कवच दिले आहे.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोखरण चाचणीसंबंधीतील फोटो...