आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रपती पूत्र अभिजित मुखर्जींमुळे काँग्रेसची नाचक्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित यांच्यामुळे सोमवारी लोकसभेत पक्षाची नाचक्की झाली. ते विनियोग विधेयक २०१५ वर भाषण देण्यासाठी उठले खरे, मात्र तिसऱ्या विधेयकावर बोलू लागले.
कायदामंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी विनियोग विधेयक सादर केले होते. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विधेयकावर चर्चा सुरू केल्यानंतर भाषणासाठी अभिजित यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, त्यांनी तिसऱ्याच विधेयकावर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा महाजन म्हणाल्या, माननीय सदस्य, तुम्हाला विनियोग विधेयकावर बोलायचे आहे. तुम्ही कोणत्या विधेयकावर बोलत आहात? यानंतर ते भांभावून गेले. त्यांनी आणलेला दस्तऐवज तपासून पाहिला आणि काही वेळानंतर ते खाली बसले.
यानंतर भाजपचे पी.पी. चौधरी बोलण्यास उठले. यादरम्यान काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दीपेंद्र सिंह हुड्डा, के. सी. वेणुगोपाल आणि अन्य काही सदस्य मुखर्जी यांच्याजवळ गेले. त्यांचे दस्तऐवज पाहू लागले. सभागृहात याची बऱ्याच वेळ चर्चा झाली.