आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनधनच्या खात्यांवर सुमारे ६४ हजार ५६४ कोटी रु.जमा; आर्थिक क्षेत्रातील नवी कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जनसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोदी सरकारच्या जनधन बँक खात्याच्या योजनेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. म्हणूनच नोटबंदीनंतरच्या पहिल्या सात महिन्यांत या खात्यांवर सुमारे ६४ हजार ५३४ कोटी रुपये जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

सर्व नागरिकांपर्यंत बँकेची सेवा पुरवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या योजनेचा कोट्यवधी नागरिकांनी लाभ घेतला आहे. माहिती हक्क कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या अर्जाद्वारे ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार १४ जूनपर्यंत जनधन अंतर्गत २८.९ कोटी खात्यांची भर पडली होती. ग्रामीण भागात ४.७ कोटी व खासगी क्षेत्रातून ९२.७ लाख खाती सुरू करण्यात आली आहेत. देशभरातील नव्या खात्यांतील एकूण जमा रक्कम ६४ हजार ५६४ कोटींच्या घरात जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही रक्कम २५. ५८ कोटी रुपये एवढी होती. 
बातम्या आणखी आहेत...