आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवयानी खोब्रागडे प्रकरणानंतर भारताचे जशास तसे उत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकी वकिलातीमधील अधिकार्‍यांना मिळणार्‍या राजनैतिक संरक्षण व सवलतींना मंगळवारपासून भारताने कुंपण घातले आहे. या अधिकार्‍यांना नवी ओळखपत्रे जारी करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार्‍या राजनैतिक सवलतीही बंद करण्यात आल्या आहेत. देवयानी प्रकरणात भारताने कडक भूमिका घेत ही कारवाई केली.
भारतात अमेरिकेच्या चार वकिलाती आहेत. या वकिलातींमधील अधिकार्‍यांना मंगळवारी नवी ओळखपत्रे जारी केली आहेत. त्यांना मर्यादित राजनैतिक सवलती मिळणार आहेत. एखाद्या गंभीर गुन्ह्यात अडकल्यास त्यांनाही भारतीय कायद्याप्रमाणे वागवण्यात येईल. अमेरिकेतील भारतीय अधिकार्‍यांना मिळणार्‍या
मर्यादित सवलतींएवढ्याच या सवलती आहेत. तसेच अमेरिकी अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांना मिळणारे राजनैतिक ओळखपत्रेही काढून घेण्यात आली आहेत.