आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ABP च्या मालकाची मुलगी, अनेक अब्जाधीशांनी लावले यांच्या उद्योगात पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकी सरकार - Divya Marathi
चिकी सरकार
नवी दिल्ली - आनंद बाजार पत्रिकेचे (ABP) मालक अवीक सरकार यांची कन्या चिकी सरकार देशातील पहिली फोन पब्लिशर (फोन प्रकाशिका) म्हणून पुढे येणार आहे. तिच्या कंपनीचे नाव जॅगरनट आहे. यात इन्फोसिसचे माजी सीईओ नंदन निलकेणी, फॅब इंडियाचे एमडी विल्यम बिसेल यांच्यासह अनेक अब्जाधीशांनी गुंतवणूक केली आहे. स्वतःची प्रकाशन संस्था उभी करण्याआधी चिकीने जगप्रसिद्ध पेंग्विन प्रकाशनात काम केले आहे. तिच्या करिअरची सुरुवात लंडनमधील ब्लूम्सबेरी पब्लिशिंग हाऊसमधून झाली. भारतात मोबाइलने अनेक गोष्टी तळहातावर आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे फोनवर अवलंबून असणाऱ्या या जनरेशनसाठी ई-बुक देण्याचा तिचा मानस आहे.
लेखकांना देणार प्लॅटफॉर्म
ही प्रकाशन संस्था लेखकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीला ई-बुक ग्राहकांकडून मोठी आपेक्षा आहे. चिकी सरकारने देशातील अनेक नामांकित लेखकांसोबत यापूर्वी काम केले असून नव्या लेखकांना तिने संधी दिली आहे. त्यामुळे या नव्या माध्यमातून नवीन टॅलेंट पुढे आणण्यासाठीही योजना आखल्या जातील.

2016 पासून प्रिटिंग
चिकी सरकारची कंपनी एप्रिल 2016 पासून छापील पुस्तकांचे प्रकाशन करणार आहे. दर वर्षी 50 पुस्तके छापण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला हे. त्याआधी डिजीटल प्रोग्रामची घोषणा होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चिकी सरकारचे PHOTOS..