आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abu Azami Women Sex News In Marathi, SP, Elections

आझमी बरळले, विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलांना फाशी द्या; सून म्हणाली, पटत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समाजवादी पक्षात वादग्रस्त वक्तव्य करण्यात जणू चढाओढ लागली आहे. सर्वांत आधी आझम खान म्हणाले, की मुस्लिम जवानांनी कारगिल युद्धात विजय मिळवून दिला. त्यानंतर बलात्कारावर बोलताना मुलायमसिंह म्हणाले, की ती मुले आहेत. चुका होत असतात. परंतु, आता या युद्धात अबू आझमी यांनी अनपेक्षित उडी मारली आहे. ते म्हणाले आहेत, की विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. दरम्यान, यावर मत व्यक्त करताना त्यांची सून आणि अभिनेत्री आयोशा टाकिया ट्विटरवर म्हणाली, की मी अबू आझमी यांचा आदर करते. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की माझी मते त्यांच्यासारखीच असावीत.
मुलायमसिंह यांच्या वक्तव्यावर विचारले असता अबू आझमी म्हणाले आहेत, की ज्या महिला संमतीने किंवा विनासंमती इतर पुरुषांसोबत संबंध ठेवतात त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. इस्लाममध्ये बलात्काराची शिक्षा मृत्यूदंड आहे. परंतु, भारतात महिलांना शिक्षा दिली जात नाही. केरळ पुरुषांना दोषी धरले जाते. तेही जेव्हा महिला दोषी असतात.
आणखी विस्ताराने सांगताना अबू आझमी म्हणाले, की भारतात तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवता ते योग्य आहे. परंतु, ती व्यक्ती जेव्हा याची तक्रार नोंदविते तेव्हा समस्या निर्माण होते. मुली केव्हाही तक्रारी देतात. त्यांना कुणी स्पर्श केला तरी किंवा नाही केला तरी. अशा परिस्थितीत पुरुषाची प्रतिष्ठा राहत नाही.
बलात्काराच्या समस्येवर काय उपाय आहे, असे विचारल्यावर आझमी म्हणाले, की जर एखादी महिला ती लग्न झालेली असो किंवा नसो ती एखाद्या पुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असेल तर दोघांनाही फाशीची शिक्षा व्हायला हवी.
अबू आझमी यांना सोशल नेटवर्कींग साईट्सवर पडल्या शिव्या...वाचा पुढील स्लाईडवर...