(फोटो: उत्तर प्रदेशात नुकत्याच्या झालेल्या पोटनिवडणुकीआधी 'लव्ह जिहाद' या मुद्यावर स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'पाश्चजन्य'मध्ये 'प्यार अंधा या धंदा' या शिर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता.)
नवी दिल्ली- भाजपची विद्यार्थी शाखा 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) दिल्ली युनिर्व्हसिटीत 'लव्ह जिहाद' विरोधात प्रचार मोहिम सुरू करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर 'लव्ह जिहाद' विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे एबीव्हीपीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष ममता यादव यांनी 'डेली भास्कर'शी बोलताना सांगितले.
मोहिमेद्वारा देशातील महिलाची सुरक्षा आणि त्यांचा सम्मानाचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. एबीव्हीपीच्या ने 'दारु मुक्त समाज' या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृतीही केली जात आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा 'नॅशनल स्टूडेंट्स युनियन ऑफ इंडिया'ने (एनएसयुआय) एबीव्हीपीच्या मोहिमेवर टीका केली आहे. एबीव्हीपीची मोहीम म्हणजे वैचारिक दिवाळखोरी असल्याचे एनएसयुआयचे दिल्ली शाखाचे प्रभारी मोहित शर्मा यांनी म्हटले आहे.
धर्म परिवर्तन स्वीकार्य नाही- एबीव्हीपी
'लव्ह जिहाद' विरोधात सुरु करण्यात येणार्या मोहिमेच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींमध्ये जनजागृती केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यात 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
काही तरुण खोटे नाव सांगून तरुणींना
आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांना धर्म परिवर्तन करून त्यांच्याशी निकाह करतात, या प्रकाराला आमचा विरोध आहे. प्रेमाला आमचा विरोध नसल्याचेही ममता यादव यांनी स्पष्ट केले आहे.
भोळ्याभाबड्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा धर्म परिवर्तन करण्यास त्यांना जोर जबरदस्ती करत आहे. एबिव्हीबी हे कदापी सहन करणार नसल्याचे ममता यादव यांनी सांगितले.
एबीव्हीपी ही स्वतंत्र संघटना आहे. ही संघटना स्वतंत्र विचारसरणीवर चालते. कोणत्या राजकीय पक्षाच्या निर्देशांवर आम्ही कार्य करत नाही. एबीव्हीपीने नेहमी महिलांचा सन्मान केला आहे.