आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ABVP Members Shouted \'Pro Pakistan\' Slogans, Alleges Video Gone Viral

कन्हैयाला दोन दिवसांची कोठडी, वकील - प्राध्‍यापक कोर्टातच भिडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारहाण करताना वकील. - Divya Marathi
मारहाण करताना वकील.
नवी दिल्ली - देश विरोधी नारे दिल्‍याचा आरोप असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्‍यक्ष कन्हैया याला आज (सोमवार) पटियाळा हाउस न्‍यायालयामध्‍ये हजर करण्‍यात आले. त्‍याला न्‍यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्‍यान, कोर्टामध्‍ये वकील आणि विद्यापीठाचे प्राध्‍यापक एकमेकांत भिडले तर पटियाळा कोर्टाबाहेर भाजपचे आमदार ओपी शर्मा यांनी एका विद्यार्थ्‍याला मारहाण केल्याचा आरोप असून, या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्‍यान, संबंधित विद्यार्थ्‍याला वैद्यकीय चाचणीसाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
नेमके काय झाले...
> आपण कुणालाही मारहाण केली नाही, असे भाजप आमदार ओ.पी. शर्मा म्‍हणाले.
> कन्हैया कुमार याला न्‍यायालयात हजर केल्‍यानंतर वकिलांनी प्राध्‍यापकांना बोहर जाण्‍यास सांगितले.
> त्‍यानंतर वकील आणि प्राध्‍यापकांमध्‍ये धक्‍काबुक्‍की झाली. यामध्‍ये काही जणांना इजा झाल्‍याचेही वृत्‍त आहे.
> दिल्लीचे पोलिस आयुक्‍त गृहमंत्र्यांची भेट घेण्‍यास रवाना.
कॉंग्रेस नेत्‍याने अफजल गुरुला केला आदरार्थी उल्‍लेख
जेएनयू वादासंदर्भात कॉंग्रेस प्रवक्‍ता रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पण, यावेळी त्‍यांनी दहशतवादी अफजल गुरु याचा आदरार्थी उल्‍लेख करत त्‍याला अफजल गुरु 'जी'मध्‍ये म्‍हटले. त्‍यामुळे नवा वाद निर्माण झाला.
हिटलरवाद काँग्रेसच्या DNA मध्ये, शहांचा सवाल
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) घोषणाबाजी आणि त्यानंतरचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. विद्यापीठ बंदची हाक दिल्याने सोमवारी जेएनयू ठप्प आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ब्लॉग लिहून राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात फुटीरतावाद्यांना मोकळीक देऊन त्यांना आणखी एक फाळणी हवी आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यासोबतच त्यांच्या पक्षाने दिल्लीत पोस्टर लावून जेएनयूमध्ये जाणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्षांकडून खुलासा मागितला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहे शहांच्या ब्लॉगमध्ये ?