नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला. भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) चारही जागा जिंकत बाजी मारून इतिहास लिहिला. संघटनेला अठरा वर्षांनंतर हे यश मिळाले आहे.
अभाविपच्या सदस्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. अभाविपसाठी हा मोठा विजय असल्याचे मानले जाते. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अभाविपच्या मोहित नागर याने २०,७१८ मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदाच्या लढतीत परवेश मलिक याने २१,९३५ मतांनी विजय मिळवला. सचिवपदी कानिका शेखावत हिने सहसचिव पदावर आशुतोष माथुर यांनी विजय मिळवला.