आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा; एनएसयूआय द्वितीय आप तिसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभाविपच्या विजयी उमेदवारांची अशी मिरवणूक काढण्यात आली होती. - Divya Marathi
अभाविपच्या विजयी उमेदवारांची अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
नवी दिल्ली - भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा चारही प्रमुख पदांवर विजय मिळवला. काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) दुसऱ्या तर आम आदमी पार्टीची सीवायएसएस संघटना तिसऱ्या स्थानी राहिली.

अध्यक्षपदी अभाविपचे सतेंद्र अवाना यांनी एनएसयूआयचे प्रदीप विजयर यांचा ६ हजार ३२७ मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष पदासाठी अभाविपचे सन्नी डेढाने सीवायएसएसच्या गरिमा राणाचा ७ हजार ५७० मतांनी पराभव केला. सचिव पदासाठी अभाविपच्या अंजली राणाने एनएसयूआयचे अमित सहरावत यांना ४ हजार ६१० मत आणि संयुक्त सचिव पदासाठी अभाविपचे छतरपाल यादव यांनी एनएसयूआयचे दीपक चौधरी यांना ६ हजार ०४५ मतांनी पराभूत केले. एकूणच अभाविपचा दबदबा वाढला.

‘आप’ला धक्का
निवडणुकीतील निकालामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. याचवर्षी झालेल्या दिल्ली निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून इतिहास रचला होता. त्यादृष्टीने सीवायएसएसचे अपयश हे पक्षाच्या घटणाऱ्या लोकप्रियतेचे द्योतक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी स्वत: या निवडणुकीत रस दाखवला होता.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...