आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयातील एसीचा गारवा लठ्ठपणाचे कारण ठरतोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कार्यालयात दिवसातील बराच वेळ तुम्ही घालवता. त्यात एअर कंडिशनरमध्ये (एसी) बसणे अगदी स्वाभाविक आहे. एसीमध्ये बसण्याचे काही फायदे आहेत व काही तोटे. म्हणूनच स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे हाच त्यावरील उपाय ठरेल. हा दावा अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

तुमच्यासाठी हे चांगले आहे जर...
> एअर कंडिशनरचा वापर करून तुम्ही शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवू शकता.
> तुम्हाला आरामदायी वातावरण देतो.
> वातावरणातील संसर्गापासून तुमचा बचाव करतो.
> एक चांगला एसी तुम्हाला आरोग्यदायी हवा पुरवतो.

हानिकारकही आहे कारण...
>अलाबामा विद्यापीठातील संशोधकांच्या मते एसीचा अधिक वापर हा लठ्ठपणा वाढवणारा ठरू शकतो.
>थंड जागी आपली ऊर्जा खर्च होत नसते. यातूनच शरीरातील मेद वाढतो. उपाय : खानपानाच्या सवयींकडे बारकाईने लक्ष ठेवा.

डोळ्यातील कोरडेपणा
सातत्याने एसीमध्ये राहिल्याने डोळ्यातील कोरडेपणा वाढू लागतो. डोळ्यात पाणी, जळजळ आणि खाज अशी त्याची लक्षणे आहेत. उपाय : ओमेगा-३, एसडीचा वापर करा. डोळ्यांना धुणे आणि योग्य वेळी पापण्यांची उघडझाप करणे.

सांधेदुखी
थंड वातावरणाचा थेट परिणाम शरीराच्या सांध्यांवर होतो. गुडघे, घोटे, मान, मनगट इत्यादी. अशा अवस्थेत दीर्घकाळ राहिल्यास मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो.
उपाय : एका जागी अधिक वेळ बसू नका. वेदना असलेल्या ठिकाणी अधिक हालचाली करा.

श्वासाची समस्या
एसी घाणेरड्या अवस्थेत असल्यास त्रास होऊ शकतो. त्यात गळ्यात खरखर आणि शिंकेची समस्या जाणवू शकते.
उपाय : कार्यालयातील एसीची देखभाल-दुरुस्ती सातत्याने होईल, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे.
डोकेदुखी : सातत्याने एसीमध्ये बसल्याने मांसपेशी आकुंचन पावलेल्या असतात. हे डोकेदुखीचे एक मोठे कारण मानले जाते. सातत्याने एकसारख्याच तापमानात बसू नका. उपाय : स्वत:ला बदलणा-या वातावरणाशी मिळते-जुळते करून घ्या. थंडीत डोक्याला झाकून घ्या.