आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल यांच्या दिवंगत साडूच्या घरावर एसीबीचा छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भ्रष्टाचारप्रतिबंधक शाखेने (एसीबी) अरविंद केजरीवाल यांचे दिवंगत साडू सुरेंद्र कुमार बन्सल यांच्या घरावर छापा टाकला. सार्वजनिक बांधकाम विभागातील १० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली.
 
एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बन्सल यांच्याव्यतिरिक्त पवनकुमार कमलकुमार भागीदारांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. त्या वेळी अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली. बन्सल यांचा गेल्या मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी मे रोजी एसीबीने बन्सल यांची कंपनी विभागीय अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केले. मात्र, एफआयआरमध्ये बन्सल यांचे नाव नाही. २०१५-१६ दरम्यान दिल्लीतील रस्ते सीवर लाइनची कंत्राटे देण्यात घोटाळा झाला, १० कोटी रुपयांचे बनावट देयक तयार करून बनावट कंपन्यांना पैसेही दिले, असा आरोप झाला आहे. पीडब्ल्यूडी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर बन्सल यांना कंत्राट देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता.
 
केजरींना नोटीस : केंद्रीयमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या १० कोटींच्या मानहानीच्या नव्या दाव्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना नोटीस काढून उत्तर मागवले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...