आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली महिला आयोगावर एसीबीचा छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने (गुरुवारी) दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयावर छापा टाकला. आयोगाच्या भरतीत सदस्यांच्या नातेवाइकांची वर्णी लावण्यात आल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षआ बरखा शुक्ला सिंह, दिल्लीचे माजी मुख्य सचिव उमेश सहगल आणि विधानसभेतील विरोधी नेते विजेंद्र गुप्ता यांनी या तक्रारी केल्या होत्या. छाप्याच्या वेळी आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी एसीबीच्या पथकाला राखी बांधून आपला विरोध दर्शवला.

आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियम धाब्यावर बसवून आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या, असा आरोप आहे. १५ दिवसांपूर्वी केलेल्या या तक्रारींत ८५ जणांना नोकरी िदल्याचा आरोप करण्यात आला आहे. सूत्रांनुसार सुरुवातीच्या चौकशीत घोटाळा दिसल्याने एसीबीने गुरुवारी सकाळी १०.३० वाजता छापा टाकला. आयोगाचे सदस्य सचिव पी. पी. ढल यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. काही फायलीही तपासण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...