आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • According To Economists, Positive Changes Are Seen In The Economy Of The Country

अर्थतज्ज्ञांच्या मते, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसताहेत सकारात्मक बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्थव्यवस्थेत जी घसरण व्हायची ती झाली, आता सुधारणा होईल. औद्योगिक उत्पादन आकडेवारीत तेजी आहे. कार विक्रीत वाढ, घर विक्रीही पूर्ववत होत आहे. नोटबंदी-जीएसटीचा परिणाम ओसरून मागणी वाढतेय. केंद्राने पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे. मान्सूनही चांगला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेसाठी दिवाळी लाभाची असेल. विशेष चर्चेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष व अर्थतज्ज्ञ राजीवकुमार यांनी हे मत व्यक्त केले.

क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी.के.
जोशी म्हणाले, ‘महागाई दर अवाक्यात, रुपया स्थिर, वित्तीय तूट नियंत्रणात आहे. बाजारात रोखी असल्याने व्याजदरही घटले आहेत. येत्या तिमाहीपासून अर्थव्यवस्थेत सुधारणा सुरू होईल.’ क्रिसिलने ७% विकासाचे अनुमान व्यक्त केले अाहे. असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत म्हणाले, निर्यातीत सुधारणा आहेत. किमान ७ क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसत आहेत.
 
- अौद्योगिक उत्पादनात तेजी, कार विक्री वाढली, कर्जेही स्वस्त
 
- परकीय चलन गंगाजळी ४०० अब्ज डॉलरवर 
२५ ऑगस्ट १७३९४.५५ अब्ज डॉलर
१ सप्टें. २०१७३९८.१२ अब्ज डॉलर
 
- विमान प्रवासी वर्षात १० लाखांनी वाढले
जुलै २०१६८५.०८ लाख
जुलै २०१७९५.६५ लाख
(स्रोत : डीजीसीए)
 
- जुलैत १०२% वाढले औद्योगिक उत्पादन
जून २०१७ -०.२%
जुलै २०१७ १.२%
 
- ऑगस्टमध्ये कारची विक्री १२% वाढली
ऑगस्ट २०१६ १,७७,८२९
ऑगस्ट २०१७१,९८,८११
(स्रोत : सियाम)
 
- उद्दिष्टापेक्षा ३,७०० कोटी रुपये अधिक जीएसटी कर संकलन
सरकारचे अनुमान जुलैत ९१ हजार कोटींचे होते; ९४,७०० कोटी आले. हा आकडा वाढू शकतो. कारण अद्याप खूप नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी रिटर्न फाइल केलेलेच नाही.

- वर्षभरात १% स्वस्त झाले कर्ज
गेल्या आठवड्यात बँकांनी कर्ज सुमारे १% स्वस्त केले अाहे. सप्टेंबर २०१६ मध्ये एसबीआयचा एमसीएलआर ९.१% होता, तो आता ८ टक्क्यांवर आला आहे.
बातम्या आणखी आहेत...