आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Accused Can’t Be Kept In Custody For Indefinite Period: Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोणाही आरोपीला अनिश्चित काळ अटकेत ठेवता येणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खटला एका निश्चित वेळी सुरू होऊन संपण्याची शक्यता नसेल तर अशा परिस्थितीत आरोपीला अनिश्चित काळापर्यंत अटकेत ठेवले जाऊ शकत नाही,असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे एमडी विनोद भंडारी यांना २०१२ च्या पीएमटी घोटाळा प्रकरणात गेल्या वर्षी ३० जानेवारीला मध्य प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि आयटी कायद्याअंतर्गत आरोप आहेत. त्यांच्या जामिनावरील सुनावणी वेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

लवकर सुनावणी हा अधिकार
खटल्याची वेगवान सुनावणी हा आरोपीचा अधिकार आहे. खटला सुरू होण्याची कुठलीही शक्यता नसेल तर अशा स्थितीत आरोपीला अटकेत ठेवले जाणे, हा चिंतेचा विषय आहे. खटला लवकर सुरू होऊन त्याची सुनावणीही सुरू झाली पाहिजे, असे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती ए. के. गोयल यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे.