आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतंजलिचे CEO घेत नाही पगार, आयफोनपासून रेंज रोव्हरपर्यंत अशी जगतात लक्झरी लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या ताज्या यादीत स्थान मिळालेले आचार्य बालकृष्ण यांची लाइफ स्टाइल अतिशय लक्झरी आहे. ते रेंज रोव्हर कारने फिरतात आणि त्यांच्या हातात अॅपलचा आयफोन असतो. फोर्ब्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बालकृष्ण 25 हजार कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. देशभरात सध्या स्वदेशी म्हणून जो ब्रँड रामदेवबाबा रुजवत आहे, त्या पंतजलीचे बालकृष्ण चीफ एक्झिकेटीव्ह ऑफिसर (सीईओ) आहेत.
रेंज रोव्हर - आयफोन
- बालकृष्ण यांच्याकडे रेंज रोव्हर कार आहे. या कारचा ते रोज उपयोग करतात. घरून ऑफिसला जाण्यासाठी ते हीच कार वापरतात.
- त्याशिवाय हरिद्वार येथील 150 एकर जमीनीवर विस्तीर्ण पतंजलि कॉम्पलेक्समध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही ते याच कारचा वापर करतात.
- त्यांच्याकेड एक साधारण फोन आहे, ज्याची किंमत दोन हजार रुपये आहे. त्याशिवाय त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे एक आयफोन देखील आहे.
पगार घेत नाही
- हरिद्वार येथील दिव्य फार्मसी नावाने पतंजलि ग्रुपची सुरुवात झाली होती. सुरुवातीला ते आयुर्वेदिक साहित्याची विक्री करीत होते.
- 50 कोटी रुपये कर्ज घेऊन त्यांनी ही कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर 10 हजार कोटींच्या आसपास आहे.
- पतंजलिची सीईओ असलेले बालकृष्ण पगार घेत नसल्याचे सांगतात. वास्तविक पतंजलिचा 97 टक्के वाटा त्यांच्या नावावर आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुठे झाली होती रामदेव व बालकृष्ण यांची भेट..
बातम्या आणखी आहेत...