आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी झाली आई, म्हणायची-मला पाहून मूल घाबरेल का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपण तिचा चेहरा पाहून कदाचित घाबरू, पण पीहूसाठी तो सर्वात सुंदर चेहरा आहे. अॅसिड हल्ल्याचे लक्ष्य ठरलेली लक्ष्मी आई झाली आहे. पीहू तिची मुलगी असून ती सात महिन्यांची झाली आहे. आणि लक्ष्मी पुन्हा अॅसिड हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या मुलींच्या लढाईत उतरली आहे. पहिल्यांदाच तिने आपल्या मुलीची कहाणी, छायाचित्र ‘दैनिक भास्कर’मार्फत जगाशी शेअर केले.

लक्ष्मी आणि आलोक अडीच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. सात महिन्यांपूर्वी पीहूचा जन्म झाला. जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अडचण आली. तेथे आई-वडिलांची नावे लागतात. आलोक म्हणाले, ‘पीहूची संपूर्ण काळजी लक्ष्मी घेते. मुलींना सिंगल पेरेंट बनण्याचा हक्क मिळायला हवा. पुढेही आम्ही पीहूला परंपरा ओलांडून पुढे घेऊन जाण्यासाठी लढा देऊ. तिला शाळेत पाठवणार नाही.’ सध्या पीहूचा जास्तीत जास्त काळ अॅसिड हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या पीडितांसाठी काम करणाऱ्या ‘स्टॉप अॅसिड अटॅक कॅम्पेन’च्या कार्यालयात व्यतीत होतो. अॅसिडमुळे भाजलेले चेहरे पाहून ती घाबरत नाही. ती हसतेही आईला पाहून आणि रडायला लागली की आईला पाहिल्यानंतरच चूप होते. आलोक सांगतात, ‘मूल आपला चेहरा पाहून घाबरणार तर नाही ना, अशी भीती लक्ष्मीला गर्भवती असताना वाटायची. पण आम्ही तिला समजावले. लक्ष्मी तिची आई आहे याचा तिला अभिमानच वाटेल.’ लक्ष्मी सध्या लखनऊतील अॅसिड हल्ला पीडितांद्वारे राबवल्या जाणाऱ्या शीरोज कॅफे प्रकल्पाचे काम पाहते आहे. पुढील वर्षी उद‌्घाटन होईल. पीहूही आईसोबत असते.
लक्ष्मी १६ वर्षांची होती तेव्हा (२००५ मध्ये) तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. तिच्याच अर्जावर सुप्रीम कोर्टाने अॅसिडच्या खुल्या विक्रीवर बंदीचा आदेश दिला होता. मिशेल ओबामा यांनी २०१४ मध्ये लक्ष्मीला ‘इंटरनॅशनल वुमन फॉर करेज’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
बातम्या आणखी आहेत...