आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटिज्म, अॅसिड हल्ला पीडितांना 4 टक्के आरक्षण, पदोन्नतीतही लाभ देण्याचा केंद्राचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - ऑटिज्म (गतीमंद) आणि अॅसिड हल्ला पीडितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि पदोन्नतीमध्ये 4 टक्के आरक्षणाला लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यासाठी एक धोरण तयार करत आहे. या धोरणात गतीमंद उमेदवारांना व्हॅकेन्सी, प्रमोशन कोटा आणि वयात सुद्धा सूट देण्याचा प्रस्ताव आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्वच 15 मंत्रालयांना हा प्रस्ताव पाठवून सल्ले मागितले आहेत. 
 
वाद निर्माण होण्याची भिती
- गतिमंद व्यक्तींना प्रमोशनमध्ये आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. अशात सरकारने हा निर्णय घेतल्यास नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 
- गतिमंद उमेदवारांना ही सूट कार्यालयीन सहाय्यक पासून आयएएस अधिकाऱ्यापर्यंत देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. 
- मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मते, "सरळ सेवा भरती प्रक्रियेत अ, ब, क आणि ड या प्रत्येक ग्रुपमध्ये गतिमंद आणि अॅसिड हल्ला पीडितांना 4 टक्के आरक्षण दिले जाईल."
बातम्या आणखी आहेत...