आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Across The Country 125 Toll Plaza Close, Nitin Gadkari Give Information

देशभरातील १२५ टोलनाके बंद होणार, नितीन गडकरी यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील महामार्गावर असलेल्या सुमारे १२५ टोलनाक्यांना महिना अखेरीस बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले. महामार्गावरील ६५ प्रकल्पांवर असलेले टोलनाके सरकारने अगोदरच बंद केले आहेत. टोलनाके तसेच इतर काही कारणांमुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. नवीन व्यवस्था इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर आधारित असेल. ही व्यवस्था देशभरात लागू झाल्यानंतर सुमारे ८८ हजार कोटी रुपयांची बचत करणे शक्य होईल. त्यासाठी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडवर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे ५० कोटी रुपयांहून कमी गुंतवणूक असलेले प्रकल्प टोलमुक्त करण्याचेही सरकारने ठरवले आहे.

मुंबई-दिल्ली मार्गावर आता ई-टोल
देशात ३५० ई-टोल उभारण्यात येतील. त्यापैकी मुंबई-दिल्ली मार्गावरील १४० टोलचे रूपांतर लवकरच ई-टोल पॉइंटमध्ये होईल.