आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Across The Country Maggi Test Failed, Amitabh, Madhuri, Priti Arrest Possible

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशभरात चाचण्यांत मॅगी फेल; अमिताभ, माधुरी, प्रीतीला अटक शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मॅगी नूडल्स प्रत्येक चाचणीत अपयशी ठरत आहेत. आधी यूपी, आता दिल्लीमध्ये झालेल्या चाचण्यांत मॅगी खाण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील चाचण्यांत १३ पैकी १० नमुन्यांत मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात शिसे आढळले. यानंतर राज्य सरकार नेस्लेविरुद्ध गुन्हा नोंदवणार आहे.

दरम्यान, केरळ सरकारने आपल्या सर्व १४०० आऊटलेट्समध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी आणली आहे. चाचण्यांत मॅगी पास झाल्यासच विक्रीची परवानगी दिली जाईल. राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक सरकारने मॅगीचे नमुने घेऊन चाचण्यांसाठी पाठवले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

ब्रँड अॅम्बेसेडर्सवर गुन्हे :
बिहारमधील मुजफ्फरपूरच्या न्यायालयाने मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा व माधुरी दीक्षितविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

नेस्ले दूध पावडरमध्ये अळ्या :
नेस्लेच्या दूध पावडरच्या ३८० ग्रॅम पाकिटाच्या नमुन्यात २८ जिवंत अळ्या व २२ तांदळातील किडे आढळले आहेत.

५० टक्के विक्री घटली
गेल्या आठवड्यात वाद सुरू झाल्यानंतर देशभरात मॅगीची विक्री ४० ते ५० टक्क्यांनी घटली. मॅगी इंडियाने ट्विटमध्ये म्हटले की, चाचण्या झालेले नमुने नोव्हेंबर २०१४ च्या एक्सपायरी डेटचे होते. ते आता बाजारात नाहीत. शिसे हे जमीन व पाण्यातच असते.