आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action On Farmers, Not Richs Supreme Court Ask Reserve Bank

शेतकऱ्यांवर कारवाई, श्रीमंतांची मात्र मौज; सुप्रीम कोर्टाने RBI ला फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँकांची मोठी कर्जे बुडवण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी केली अाहे. कोर्ट म्हणाले, काही हजार रुपयांचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या वसुलीसाठी सर्व उपाय केले जातात, शेतकऱ्यांना शेतही विकावे लागते आणि हजारो कोटींचे कर्ज घेणारे धनदांडगे कंपनीला आजारी घोषित करून मौज करतात. कोर्ट रिझर्व्ह बँकेला म्हणाले, तुम्ही नियामक आहात आणि तुम्ही वॉचडॉगसारखे काम केले पाहिजे. विशेष म्हणजे, नुकतेच तामिळनाडूत कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी बँकांनी दलालांना पाठवले होते.

मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर व आर. भानुमती यांच्या न्यायपीठाने म्हटले की, कॉर्पोरेट क्षेत्राचा कर्जबुडवेपणा संशय निर्माण करणारा आहे. कर्ज वसूल करण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, असा प्रश्न कोर्टाने आरबीआय आणि सरकारलाही केला.

आरबीआयने सांगितले, अनेकांनी वैयक्तिकरीत्या ५०० कोटींहून जास्त रकमेची कर्जे घेतलेली आहेत. त्यावर कोर्टाने सांगितले की, कर्जदारांची नावे गोपनीय ठेवता येतात, पण एकूण रक्कम जगजाहीर केली पाहिजे. पण यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, असा दावा बँकांनी केला.