आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activist Irom Sharmila Walks Free After 14 Years

मानवी हक्कांसाठी लढणा-या इरोम शर्मिला यांची 14 वर्षांनी सुटका, उपोषण सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सुटका झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इरोम शर्मिला चानू.)
नवी दिल्ली - इंफाळच्या स्थानिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अखेर मानवी हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्या इरोम शर्मिला चानू यांची 14 वर्षांनंतर सुटका झाली आहे. इंफाळच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयातून बुधवारी त्यांना सोडण्यात आले.

या सुटकेनंतर इरोम यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मतेही मांडली. सुटका झालेली असली तरी आपली AFSPA च्या मुद्यावरील भूमिका बदललेली नाही. त्यामुळे उपोषण सुरुच राहणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी रडत आहे, कारण मी भावनिक आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. माझ्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. सैन्याला विशेषाधिकार देण्याचा कायदा रद्द व्हायला हवा, असे त्या यावेळीही ठामपणे म्हणाल्या.

इरोम शर्मिला या सैन्याला देण्यात आलेला एएफएसपीए हा विशेषाधिकार (AFSPA) रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 14 वर्षांपासून (4 नोव्हेंबर 2000 पासून) अनिश्चित काळासाठी उपोषण करत आहेत. त्यांना वारंवार तुरुंगातून रुग्णालयात आणले जाते. त्यावेळी त्यांच्या नाकात लावण्यात आलेली नळी दिसत असते. 'आयर्न लेडी' नावाने प्रसिद्ध असलेल्या इरोम (42) यांना सध्या इंफाळच्या जवाहरलाल नेहरू संस्थेमध्ये नजरकैदैत ठेवण्यात आले होते. आत्महत्या करू नये म्हणून त्यांना नजरकैदैत ठेवण्यात आले होते.
14 लोकांच्या हत्येमुळे सुरू झाले उपोषण
इंफाळमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी 14 निर्दोष नागरिकांना गोळ्या घातल्या होत्या, त्यावेळी इरोम यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्यावेळी या घटनेची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. या घटनेतील मृतांमध्ये एका 62 वर्षांच्या वृद्धेचा आणि एका 18 वर्षीय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त युवकाचाही समावेश होता. त्याच्या विरोधात इरोमने AFSPA रद्द करण्याची मागणी करत उपोषण सुरू केले होते. तीन दिवसांनंतरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्या केवळ 27 वर्षांच्या होत्या.
पुढील स्लाईडवर वाचा, एएफएसपीए म्हणजे काय?