आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JNU मध्‍ये अनुपम खेर म्‍हणाले -देशाविरोधात बोलणारा हिरो होऊ शकत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - देशात स्‍वातंत्र मागणा-या लोकांनी देशासाठी काय केले, असे विचारत ज्‍येष्‍ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कन्‍हैय्याकुमारवर नाव न घेता निशाणा साधला. माझे आई-वडिल गरीब आहेत असे म्‍हणणारा त्‍याच्‍या आई-वडिलांसाठी काय करत आहे, असा टोलाही त्‍यांनी लगावला. जेएनयूच्‍या परिसरात शुक्रवारी सायंकाळी अनुपम यांनी विद्यार्थ्‍यांशी राष्‍ट्रवाद या विषयावर संवाद साधला. काय म्‍हणाले खेर..
- दोन वर्षांपूर्वीही देशात गरीबी, उपासमार होती.
- माझे आई-वडिल गरीब आहेत असे म्‍हणणारा त्‍याच्‍या आई-वडिलांसाठी काय करत आहे.
- लोकांमध्‍ये देशावर टीका करण्‍याची वेगळीच फॅशन सध्‍या सुरू आहे.
- देशाच्‍या विरोधात बोलणारा देशाचा हिरो होऊ शकत नाही.
- ज्‍याला जामीन मिळाला त्‍याचे स्‍वागत कसे काय होऊ शकते.
- देशाला खूप वर्षानंतर एक उत्‍तम पंतप्रधान मिळाले आहेत.
- तुम्‍हाला देशात स्‍वातंत्र हवे असेल तर देशासाठी योगदान द्या.
-"भारत माता की जय' या मुद्द्यावरील वाद हा अत्‍यंत निरर्थक आहे.
'अनुपम खेर गो बॅक' चे लागले नारे..
- दिल्‍लीच्‍या जेएनयू कॅम्‍पसमध्‍ये आपला 'बुड्ढा इन ट्रॅफिक जाम' हा चित्रपट दाखवण्‍यासाठी अभिनेते खेर पोहोचले होते.
- या कार्यक्रमाच्‍या वेळी त्‍यांना विद्यार्थ्यांनी त्‍यांच्‍या विरोधात नारेबाजी केली.
- कॅम्‍पसमध्‍ये जेथे हा चित्रपट दाखवण्‍यात आला तेथे त्‍यांच्‍या जवळच अनुपम खेर गो बॅक असे पोस्‍टर दाखवत काहींनी नारेबाजी केली.
- चित्रपट सुरू होण्‍याआधी खेर यांनी विद्यार्थ्‍यांसमोर भाषण केले.
बातम्या आणखी आहेत...