आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती, मुलाला भेटायला जमत नसल्याने बॉलिवूड ब्‍यूटी चित्रांगदा घेतेय घटस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बॉलिवूडमधील आणखी एका जोडीचे लग्न तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही जोडी आहे हॉट एंड बोल्‍ड ब्‍यूटी चित्रांगदा सिंग आणि ज्योती रंधवा यांची. चित्रांगदा आणि तिचे पती ज्‍योती रंधवा आपल्या सहमतीने घटस्फोट घेत आहेत. यासाठी दोघांनी गुरगाव कोर्टात अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी दिलेल्या अर्जात या दोघांनी म्हटले आहे की, आम्ही दोघे आमच्या मर्जीने वेगळे होण्याचा निर्णय घेत आहोत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रांगदा सिंग सध्या मुंबईत राहते. तिचा पती गोल्फपटू ज्योती रंधवा दिल्लीत राहतो. चि‍त्रांगदा बॉलिवूडमध्ये इतकी व्यस्त राहते की, तिला आपल्या पाच वर्षाच्या मुलाला व पतीला भेटायला वेळच मिळत नाही. यावरून या दोघांत कित्येकवेळा तरी वाद झाल्याचे पुढे आले होते. मात्र, प्रत्येक वेळी आणखी एक संधी म्हणत हे नाते टिकून राहिले. मात्र, आता हे दोघे एकत्र राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरगाव कोर्टाने त्यांना नोव्हेंबरची तारीख दिली आहे.

चित्रांगदाचा पती काय म्हणतो, वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...