आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Gautami Raised Questions About Secrecy Maintained Of Jayalalithaas Death Writes Modi

अभिनेत्री गौतमींची मोदींकडे मागणी- जयललिता यांचा आजार-मृत्यूचा तपास करा, गुप्तता का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दक्षिण भारतीय चित्रपटांमधील सुप्रसिध्द अभिनेत्री गौतमी यांनी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा आजार आणि निधनाबद्दल सविस्तर तपास व्हावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गौतमी यांनी ब्लॉगवर एक पोस्ट केली आहे ज्यात जयललिता यांच्या निधनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, जयललिता ७५ दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या, मात्र त्यांचा आजार आणि उपचाराबद्दल जनतेला कोणतीच माहिती का दिली गेली नाही. जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाले. २२ सप्टेंबरपासून त्या चेन्नईच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होत्या. गौतमीने कोणते प्रश्न उपस्थित केले...

- गौतमी यांनी लिहिले आहे की, "जया यांच्या प्रकृतीची माहिती एवढी लपवून का ठेवण्यात आली? त्यांच्याशी लोकांना का भेटू दिले गेले नाही? अनेक मोठ्या व्यक्ती त्यांना वैयक्तीक भेटू इच्छित होत्या, मात्र ते सुध्दा शक्य होऊ शकले नाही."
- "जयललिता यांच्या आजाराबद्दल एवढी गुप्तता का पाळल्या गेली आणि हे निर्णय कोणाचे होते? अखेर पडद्यामागून कोण निर्णय घेत होते?"
- गौतमीने शेवटी हे सुध्दा विचारले आहे की, या प्रश्नांचे उत्तर जनतेला कोण देणार?

केवळ हॉस्पिटलने दिली माहिती
- जया 75 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या, मात्र या दरम्यान त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता अथवा नातेवाईक यांना प्रकृतीची माहिती का देण्यात आली नाही. केवळ हॉस्पिटलनेच त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले.
- गौतमी यांच्यानुसार, "लोकशाहीत नेत्याची निवड जनतेच्या हातात असते. त्यांना आपल्या नेत्याबद्दलची माहिती मिळण्याचाही हक्क आहे. परंतु या प्रकरणात जनतेला कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही?"
- गौतमी नुकतेच त्यांच्या पार्टनरपासून वेगळी झाली आहे. समाजकार्यात त्या खुप अॅक्टीव्ह आहेत. २८ ऑक्टोबरला त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट सुध्दा घेतली होती.
- ब्लॉगमधून गौतमी यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहे की, "मी हे पत्र भारताची सामान्य नागरिक म्हणून लिहित आहे. मी एक घर चालवणारी महिला आहे, एक आई आहे आणि एक नोकरदार महिला आहे"
पुढील स्लाईडवर पाहा, गौतमीने घेतली मोदींची भेट आणि जयललितांच्या मृत्यूनंतर कसे शोकाकूल झाले लोक...
बातम्या आणखी आहेत...