आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहिदांना कोण म्हटले सैन्यात जा? ओमपुरींचे वक्तव्य, मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जम्मू-काश्मीरमधील उरीमध्ये शहीद झालेल्या जवानांचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेता ओम पुरी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला असता पुरी यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली होती. तसेच त्यांच्यासोबत काम सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यांना दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांविषयी विचारण्यात आले, त्या वेळी पुरी यांनी सैनिकांना सैन्यात भरती होण्याचे कोणी सांगितले होते? असा प्रश्न केला. वास्तविक वाद वाढत असल्याचे लक्षात येताच ओम पुरी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. यासाठी माझे कोर्ट मार्शल करा, असेही ते म्हणाले.

लष्कराला आपली गरज नाही..
- ओमपुरी म्हणाले, त्यांना (लष्कराला) आपली गरज नाही. आपण केवळ भुंकत नाही हे आपण प्रथमच पाकला दाखवले आहे. यापूर्वी नेत्यांनी असे का केले नाही.
- 'मोदी सरकारने बदला घेण्याचा विचार का केला, त्याऐवजी नाना (पाटेकर) ने का नाही केला. आम्ही नपुंसक आहोत हा गैरसमज आपण दूर केला.
- आमचे दात आहेत आम्हालाही चावा घेता येतो. पण आम्ही तसे करत नव्हतो. मात्र आता करणार.. वारंवार करणार, आम्हाला आर्मीवर अभिमान आहे.
- हिन्दुस्तानही एक मुस्लीम देश आहे. पहिल्या क्रमांकावर इंडोनेशिया, दुसऱ्या क्रमांकावर आम्ही आणि तिसऱ्यावर पाकिस्तान आहे. त्यांचे (पाक आर्टिस्ट्स) नातेवाईकही येथे आहेत. सगळे सलमान खान-सलमान खान का करत आहेत.
- मी मजूर आहे, मी तर काम करणारच. सरकार का त्यांचा व्हिसा रद्द करत नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, ओमपुरींच्या वक्तव्यावर काय म्हणाले ओमपुरी...
बातम्या आणखी आहेत...